शिवशाही व स्लीपर कोच मुळे प्रवासी वर्गाच्या खिशाला कात्री

शिवशाही व स्लीपर कोच मुळे प्रवासी वर्गाच्या खिशाला कात्री

Published on

शिवशाही, स्लीपर कोचमुळे भुर्दंड
प्रवासीवर्गाच्या खिशाला कात्री; लालपरी सुरू करण्याची श्रीवर्धन तालुक्यात मागणी
श्रीवर्धन, ता. १४ (वार्ताहर) : मागील काही दिवसांपासून श्रीवर्धन आगाराकडून मुंबई विभागाकडे जाणाऱ्या बसेसची संख्या कमी करण्यात आली आहे. मुंबईकडे मार्गस्थ होणाऱ्या अनेक बसपैकी साध्या गाड्या बंद करून त्या ठिकाणी वातानुकूलित शिवशाही आणि आधुनिक तंत्रज्ञान व सुखसोयींयुक्त अशी विनावातानुकूलित स्लीपर कोच सोडण्यात येत आहेत. मात्र या बसच्या भरमसाठ तिकीटदरांमुळे प्रवासीवर्गाच्या खिशाला कात्री लागली असून, या मार्गावर लालपरीच सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवासीवर्गाने केली आहे.
श्रीवर्धन स्थानकातून मुंबई, नालासोपारा, बोरिवली आणि पुणे या मार्गावर अनेक वर्षे साध्या बस सोडण्यात येत होत्या. परिवहन महामंडळाने प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी या उद्देशाने २०१७ साली शिवशाही बससेवा सुरू केली. तर स्लीपर कोच बससेवा २०१९ साली सुरू करण्यात आली. श्रीवर्धन आगाराकडे आधुनिक बस उपलब्ध झाल्यावर या मार्गावरील काही साध्या बस बंद करून त्या ठिकाणी शिवशाही व स्लीपर कोच बस सुरू करण्यात आल्या. साध्या बसच्या तुलनेत स्लीपर कोच बसच्या माध्यमातून राज्य परिवहनला प्रति किलोमीटर २७ रुपयांचे उत्पन्न मिळते. शिवशाही बसचे हे उत्पन्न प्रति किलोमीटर सत्तेचाळीस इतके आहे. राज्य परिवहन मंडळाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत असली तरी सामान्य प्रवासीवर्गाला मात्र याचा फटका बसत आहे.

सुखसोयी की त्रास
शिवशाही बसची वातानुकूलित यंत्रणा सुरू झाल्यावर गाडीचा वेग कमी होतो. श्रीवर्धन तालुक्यातील अनेक रस्ते हे घाट रस्ते आहेत. घाटात बस योग्य वेगात चढण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काही वेळासाठी बंद करावी लागते, ही यंत्रणा बंद केल्यास प्रवासी वर्ग उकाड्याने घामाघूम झाल्याने अनेकदा चालकाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते. स्लीपर कोच बसेसचे अनेक पंखे बंद, आसनांची दुरावस्था यामुळे प्रवासी वर्गाला जास्त तिकीट भाडे देऊन सुद्धा समाधान मिळत नाही.

बसेसचे तिकीट दर :
श्रीवर्धन मुंबई-साधी गाडी ३३८- स्लीपर ४४३- शिवशाही ४८७/
श्रीवर्धन बोरिवली- साधी गाडी ३५८/- स्लीपर ४१२- शिवशाही ५३१/
श्रीवर्धन नालासोपारा -साधी गाडी ४१८- स्लीपर ५५६-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com