ढोलकीच्या तालातून एकात्मतेचा संदेश

ढोलकीच्या तालातून एकात्मतेचा संदेश

Published on

ढोलकीच्या तालातून एकात्मतेचा संदेश
रोह्यातील शेख कुटुंबीयांचा वाद्यनिर्मितीत सहभाग
रोहा ता. १८ (बातमीदार)ः पारंपरिक वाद्य असलेल्या ढोलकीला हिंदू सण समारंभात विशेष महत्त्व असते. त्यामुळे ढोलकी बनविण्याच्या पारंपरिक व्यवसायात रोह्यात राहणारे शेख कुटुंबीयांची चौथी पिढी उदरनिर्वाह करीत आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊचे रहिवासी शेख कुटुंबीय ढोलकी व्यवसायाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील रोहा येथील धावीर रोड फिरोज टॉकिजजवळ भाडोत्री म्हणून राहत आहेत. वर्षानुवर्षे रोजीरोटीसाठी व्यवसाय करणारे पंजोबा हाजी अली साहेब शेख, आजोबा हाजी मागन यांच्या पश्चात ६८ वर्षीय बल्लू शेख व त्यांचा मुलगा अबीद्दीन शेख अनेक वर्षांपासून गौरी-गणपतीसाठी रोहामध्ये येऊन सुंदर, आकर्षक ढोलक्या बनवण्याचा व्यवसाय करीत आहेत. त्यांचा हा पिढीजात व्यवसाय साधारण २०० वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. ढोलकी तयार करणे, त्यांची विक्रीच्या या व्यवसायात चौथी पिढी उतरली आहे.
-------------------------------------
१५० ते ४०० रुपयांना विक्री
उत्तर प्रदेशातील मुर्शिदाबाद शहरातून व्यवसायाला लागणारा कच्चा माल, साहित्य विकत आणून ढोलक्या तयार करीत आहेत. अनेक वर्षांपासून ही कारागीर मंडळी रोहा, तळा शहर तसेच ग्रामीण भागात फिरून व्यवसाय करतात. ढोलकीचे विविध आकार, प्रकारच्या असून, सुबकता, बाहेरील नक्षीकाम, आकारावरून १५०, २००, ३००, ४०० रुपयांना विक्री करीत आहे.
-----------------------------------
कलेतून संस्कृतीचे दर्शन
देशाची संस्कृती जगात महान अशी संस्कृती आहे. संस्कृतीने जगासमोर सर्वधर्मसमभाव, सर्वधर्मसहिष्णूतेचा आदर्श घालून दिला आहे. याच अनुषंगाने मुस्लिम बांधवांनी हिंदू धर्मातील सण समारंभात लागणारी ढोलकी तयार करून कौशल्ये दाखवून एक प्रकारे आपल्या आदर्श संस्कृतीचे दर्शनच साऱ्यांना घडवून दिले आहे.
------------------------------------------
रोहा ः गणेशोत्सवच्या अनुषंगाने बल्लू शेख ढोलकी तयार करून विक्री करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com