श्रीवर्धनमध्ये शाडूच्या मूर्तींना वाढती मागणी
पर्यावरणपूरक मूर्तींची पसंती, मूर्तिकार मात्र अडचणीत

श्रीवर्धन, ता. १७ (वार्ताहर) :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यात मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. मंगळवार, दि. २६ रोजी बाप्पा विराजमान होत असून यंदा तालुक्यातील ३१ लहान-मोठ्या गणपती कारखान्यांतून तब्बल ८,८१८ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा पारंपरिक शाडूमातीच्या मूर्तींना भाविकांकडून मोठी पसंती मिळाली असून प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तींची मागणी लक्षणीय घटली आहे.

एक ते चार फूट उंचीच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापनेची तयारी बुधवारी, दि. २७ पासून सुरू होणार आहे. तालुक्यात सध्या नवनव्या कलाकृतींनी सजलेल्या मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. जवळपास ९० टक्के मूर्ती शाडूमातीच्या तर फक्त १० टक्के पीओपीच्या मूर्ती यंदा विक्रीसाठी निघाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मूर्ती सुकण्यासाठी यावर्षी हवामान अनुकूल असल्याने कारागिरांनी समाधान व्यक्त केले आहे.

मात्र मूर्तिकारांना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. शाडूमाती आणि रंगसाहित्याच्या दरात झालेली वाढ, वीजबिलांचा लपंडाव आणि मनुष्यबळाची टंचाई यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी मूर्तींच्या किमतीत काही टक्क्यांनी वाढ झाल्याचे कारागिर सांगतात. सलग तीन महिने महावितरणकडून आलेल्या वाढीव वीज बिलांमुळेही मूर्तिकारांमध्ये नाराजी आहे.

“आमचा चार पिढ्यांपासून गणपती कारखाना आहे. मात्र आजची तरुण पिढी या व्यवसायाकडे दुर्लक्ष करत आहे. पिढ्यानुपिढ्या चालत आलेली हातकला जपली नाही तर पारंपरिक गणपती कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हातची कला टिकवण्यासाठी नव्या पिढीने पुढे यायला हवे,” अशी खंत स्थानिक मूर्तिकार उमेश आमले यांनी व्यक्त केली.

पर्यावरणपूरक शाडूमातीच्या मूर्तींना मिळत असलेली पसंती निश्चितच समाधानकारक आहे. परंतु कारागिरांच्या अडचणी सोडवल्या नाहीत, तर भाविकांना भविष्यात अशा मूर्ती सहज उपलब्ध होतील का, हा प्रश्न उपस्थित होतो.

श्रीवर्धनमध्ये शाडूच्या मूर्तींना वाढती मागणी पर्यावरणपूरक मूर्तींची पसंती, मूर्तिकार मात्र अडचणीत श्रीवर्धन, ता. १७ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यात मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. मंगळवार, दि. २६ रोजी बाप्पा विराजमान होत असून यंदा तालुक्यातील ३१ लहान-मोठ्या गणपती कारखान्यांतून तब्बल ८,८१८ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा पारंपरिक शाडूमातीच्या मूर्तींना भाविकांकडून मोठी पसंती मिळाली असून प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तींची मागणी लक्षणीय घटली आहे. एक ते चार फूट उंचीच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापनेची तयारी बुधवारी, दि. २७ पासून सुरू होणार आहे. तालुक्यात सध्या नवनव्या कलाकृतींनी सजलेल्या मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. जवळपास ९० टक्के मूर्ती शाडूमातीच्या तर फक्त १० टक्के पीओपीच्या मूर्ती यंदा विक्रीसाठी निघाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मूर्ती सुकण्यासाठी यावर्षी हवामान अनुकूल असल्याने कारागिरांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र मूर्तिकारांना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. शाडूमाती आणि रंगसाहित्याच्या दरात झालेली वाढ, वीजबिलांचा लपंडाव आणि मनुष्यबळाची टंचाई यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी मूर्तींच्या किमतीत काही टक्क्यांनी वाढ झाल्याचे कारागिर सांगतात. सलग तीन महिने महावितरणकडून आलेल्या वाढीव वीज बिलांमुळेही मूर्तिकारांमध्ये नाराजी आहे. “आमचा चार पिढ्यांपासून गणपती कारखाना आहे. मात्र आजची तरुण पिढी या व्यवसायाकडे दुर्लक्ष करत आहे. पिढ्यानुपिढ्या चालत आलेली हातकला जपली नाही तर पारंपरिक गणपती कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हातची कला टिकवण्यासाठी नव्या पिढीने पुढे यायला हवे,” अशी खंत स्थानिक मूर्तिकार उमेश आमले यांनी व्यक्त केली. पर्यावरणपूरक शाडूमातीच्या मूर्तींना मिळत असलेली पसंती निश्चितच समाधानकारक आहे. परंतु कारागिरांच्या अडचणी सोडवल्या नाहीत, तर भाविकांना भविष्यात अशा मूर्ती सहज उपलब्ध होतील का, हा प्रश्न उपस्थित होतो.

Published on

श्रीवर्धनमध्ये शाडूच्या मूर्तींना वाढती मागणी
पर्यावरणपूरक मूर्तींना पसंती, मूर्तिकार मात्र अडचणीत
श्रीवर्धन, ता. १७ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यात मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. मंगळवार, ता. २६ रोजी बाप्पा विराजमान होत असून यंदा तालुक्यातील ३१ लहान-मोठ्या गणपती कारखान्यांतून तब्बल ८, ८१८ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. विशेष म्हणजे, यंदा पारंपरिक शाडूमातीच्या मूर्तींना भाविकांकडून मोठी पसंती मिळाली असून प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तींची मागणी लक्षणीय घटली आहे.
एक ते चार फूट उंचीच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापनेची तयारी येत्‍या काही दिवसात सुरू होणार आहे. तालुक्यात सध्या नवनव्या कलाकृतींनी सजलेल्या मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. जवळपास ९० टक्के मूर्ती शाडूमातीच्या तर फक्त १० टक्के पीओपीच्या मूर्ती यंदा विक्रीसाठी निघाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. मूर्ती सुकण्यासाठी यावर्षी हवामान अनुकूल असल्याने कारागिरांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र मूर्तिकारांना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. शाडूमाती आणि रंगसाहित्याच्या दरात झालेली वाढ, वीजबिलांचा लपंडाव आणि मनुष्यबळाची टंचाई यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी मूर्तींच्या किमतीत काही टक्क्यांनी वाढ झाल्याचे कारागिर सांगतात. सलग तीन महिने महावितरणकडून आलेल्या वाढीव वीज बिलांमुळेही मूर्तिकारांमध्ये नाराजी आहे.
..................
तरुण पिढीचे व्‍यवसायाकडे दुर्लक्ष
आमचा चार पिढ्यांपासून गणपती कारखाना आहे. मात्र आजची तरुण पिढी या व्यवसायाकडे दुर्लक्ष करत आहे. पिढ्यानुपिढ्या चालत आलेली हातकला जपली नाही तर पारंपरिक गणपती कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. हातची कला टिकवण्यासाठी नव्या पिढीने पुढे यायला हवे, अशी खंत स्थानिक मूर्तिकार उमेश आमले यांनी व्यक्त केली. पर्यावरणपूरक शाडूमातीच्या मूर्तींना मिळत असलेली पसंती निश्चितच समाधानकारक आहे. परंतु कारागिरांच्या अडचणी सोडवल्या नाहीत, तर भाविकांना भविष्यात अशा मूर्ती सहज उपलब्ध होतील का, हा प्रश्न उपस्थित होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com