आसनगावमध्ये वित्तीय साक्षरतेचा जागर

आसनगावमध्ये वित्तीय साक्षरतेचा जागर

Published on

आसनगावमध्ये वित्तीय साक्षरतेचा जागर
कुंकवाइतकेच बँक खाते जपण्याचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, (ता. १७ ) : ई-केवायसी म्हणजे काय, बँक कर्ज कसे घ्यायचे, फसवणूक टाळण्यासाठी काय केले पाहिजे, विमा, पेन्शन योजना किती लाभदायक आहेत व त्यासाठी काय अटी-शर्ती आहेत, यासह दैनंदिन जीवनाशी निगडित आर्थिक विषयांवर आसनगावमध्ये तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. निमित्त होते, विशेष आर्थिक साक्षरा मोहिमेचे. या वेळी कुंकवाचा करंडा जसा आपण जपून ठेवतो, तसे आपले बँक खाते जपण्याचा सल्लाही महिलांना देण्यात आला.
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग व भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या निर्देशानुसार, ठाणे जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विशेष आर्थिक साक्षरता मोहीम राबविण्यात येत आहे. सामान्य नागरिकांमध्ये विशेषतः ग्रामीण भागातील, महिला, वृद्ध नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यात वित्तीय जागरूकता निर्माण करणे हा त्यामागील उद्देश आहे. त्यानुसार आसनगाव ग्रामपंचायतमध्येही वित्तीय साक्षरतेच्या शिबिराचे आयोजन १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या शिबिराला १५० गावकरी उपस्थित होते. बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक संदीप कुमार, उपमहाव्यवस्थापक राजकिशोर रंजीत, बँक ऑफ महाराष्ट्रचे ठाणे विभागचे व्यवस्थापक राजेंद्र कनिशेट्टी आदी मान्यवरही उपस्थित होते.
शिबिरात वित्तीय साक्षरता व सामाजिक सुरक्षा योजनांचे सविस्तर सादरीकरण केले. डिजिटल आर्थिक साक्षरता व नामनिर्देशनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ई-केवायसीचे महत्त्व, या मोहिमेचा उद्देश व ग्राहकांपर्यंत बँक सेवा ‘घरपोच’ कशा पोहोचत आहेत, याची माहिती देण्यात आली. बँक खाते कसे सुरक्षित ठेवले पाहिजे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com