पावसामुळे भाज्यांकडे ग्राहकांची पाठ

पावसामुळे भाज्यांकडे ग्राहकांची पाठ

Published on

तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक वाढली आहे; पण पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचे भाव १० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मात्र किरकोळ बाजारात दर ‘जैसे थे’ आहेत.
श्रावण महिन्यात भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. दरम्यान, मागणी वाढल्यानंतरही भाजीपाल्याच्या दरात घसरण पाहायला मिळते आहे. घाऊक बाजारात सर्वच भाज्यांच्या भानात १० ते २० टक्क्यांची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात मात्र दर चढेच आहेत. वाशीतील घाऊक भाजीपाला बाजारात भाजीपाल्याच्या ६०० ते ६५० गाड्या दररोज येत आहेत. पावसाने लवकर हजेरी लावल्याने यंदा भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवली नाही. परिणामी पीक चांगले आहे. श्रावणात भाज्यांना अधिक मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजन करून भाज्यांची लागवड केली आहे.
-----------------------------------------
पालेभाज्यांच्या दरात घसरण
कोथिंबिरीसोबत मेथी, पालक, शेपू, माठ, चवळी, मुळा अशा पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात एका जुडीला सहा-आठ रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात २०-२५ रुपये जुडी मिळत आहे. श्रावण सुरू झाल्याने मटारची आवक वाढली आहे. मटार घाऊक ६०-७० रुपयांवरून १२०-१५० रुपयांवर आहे. हे भाव खाली येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
---------------------------------------------------------
टोमॅटो ८० रुपये किलो
महिनाभरापूर्वी ३५-४० रुपये किलो विकला जाणारा टोमॅटो आता ८० रुपये किलो झाला आहे. त्यामुळे टोमॅटो खरेदी करताना ग्राहकांना हात आखडता घ्यावा लागत आहे.
---------------------------
भाज्यांचे प्रकार घाऊक किरकोळ
टोमॅटो १८ - ३८ ८०
फ्लॉवर १२ - २२ ८०
गाजर २० - ३० ८०
कोबी ८ - १२ ६०
काकडी १३ - २४ ६०
भेंडी १६ - ३६ ८० -१००
कारले १८ - २४ ६०-८०
शिमला मिरची २२ - ३६ ८०
वांगी १० -१६ ६०
दुधी भोपळा १४ - २४ ८०
मटार ६० ते ७० १२०- १५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com