भर पावसात प्राणी प्रेमी रस्त्यावर
भरपावसात प्राणिप्रेमी रस्त्यावर
पाल फाउंडेशनच्या मेणबत्ती मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कांदिवली, ता. १८ (बातमीदार) ः दिल्ली उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबाबत दिलेल्या आदेशाविरोधात अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला सर्कलमध्ये रविवारी (ता. १७) ४०० हून अधिक प्राणिप्रेमी रस्त्यावर उतरले होते. पाल फाउंडेशनने आयोजित केलेल्या मेणबत्ती मोर्चामध्ये चित्रपट कलाकार, डॉक्टर, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
न्यू म्हाडा कॉलनी ते अंधेरी लोखंडवाला सर्कल येथे प्युअर अनिमल्स लवर्स फाउंडेशनने काढलेल्या मेणबत्ती पदयात्रेत भरपावसात प्राणिप्रेमी तसेच उपासना सिंग, उर्वशी सोलंकी, मनेका हरिसिंगहनिया, अनुज सचदेवा, ऐश्वर्या सखुजा, अनुज सचदेवा, निशिगंधा सुनील, अजित शिधाया, विरल पटेल असे कलावंत, डॉक्टर सहभागी झाले होते.
सरकारने शहराला प्राणिमुक्त शहर नव्हे तर गुन्हेगारीमुक्त करावे. सरकार अजूनही बरेच काही करू शकते, परंतु मुके प्राणी बोलत नसल्याने सरकार त्यांच्या मागे लागले आहे, असा आरोप मोर्चामध्ये सहभागी प्राणिप्रेमींनी केला. विविध फलक हातामध्ये घेऊन आंदोलक सहभागी झाले होते. सरकारकडे कुत्रे ठेवण्यासाठी तेवढी जागा, पैसा आणि कर्मचारी नाहीत. मुक्या प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. आम्ही प्राणिप्रेमी हे सहन करणार नाही, असा इशारा प्राणिप्रेमींनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.