मुंबई
अंबरनाथममध्ये रस्ता पाण्याखाली
अंबरनाथममध्ये रस्ता पाण्याखाली
अंबरनाथ, ता. १८ (बातमीदार) : मुसळधार पावसामुळे अंबरनाथमधील सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. प्राचीन शिवमंदिराजवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीला पूर आल्याने नदी दुथडी भरून वाहत होती. श्रावण महिन्यातील अखेरचा श्रावणी सोमवार असल्याने पावसातदेखील मंदिरात दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पावसाच्या पाण्यामुळे कल्याण-बदलापूर महामार्गावरील बिग सिनेमा चौकात पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली.