पनवेल मध्ये ढोल ताशा पथकांचा दणक्यात सराव

पनवेल मध्ये ढोल ताशा पथकांचा दणक्यात सराव

Published on

पनवेलमध्ये ढोल-ताशा पथकांचा दणक्यात सराव
तरुणाईचा उत्साह ओलांडून वाहतोय, पारंपरिक वाद्याला मंडळाची पसंती
पनवेल, ता. १८ (बातमीदार) ः डॉल्बीच्या दणदणाटातही गणरायाच्या आगमनासाठी पारंपरिक वाद्यांना आजही पसंती दिली जात आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवात ढोल-ताशाचा आवाज वाढणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव जवळ आल्याने ढोल-ताशा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात आला आहे. ताल व लयबद्ध वादनाने ही पथके सगळ्यांनाच थिरकायला लावत आहेत. पनवेल परिसरात उड्डाणपुलाखाली, अनेक ठिकाणी चौकाचौकात मोकळ्या जागेवर ढोल-ताशा पथकांचा जोरदार सराव सुरू आहे.
सध्या गणपतीसाठी नवीन लय, ठेका व ताल शिकण्यासाठी बहुतांश ढोल-ताशा पथकातील तरुणाई सरावातून मेहनत घेत आहे. गणेशोत्सवानिमित्त जवळपास दीड महिना आधीपासून सराव सुरू होतो. नियमित पथकातील सदस्यांचा दिनक्रम पूर्ण करून सायंकाळी सहा ते नऊ या वेळेस सराव चालतो. पथकात साधारण आठ वर्षे वयोगटापासून ते ४५ वर्षे वयोगटापेक्षा १०० ते २००पेक्षा अधिक सदस्यांचा सहभाग असतो. काही पथके सदस्यांकडून शुल्क घेतात, तर काही घेत नाहीत. सध्या तरुणाईचा ढोल-ताशा मंडळांमध्ये सहभागासाठी मोठा उत्साह दिसत आहे. यासाठी मुलाखतही घेतली जाते. यात एक ते पाच असे पारंपरिक ताल असतात. याला पारंपरिक हात चालवणे असे संबोधले जाते. मिरवणुकीमध्ये सहभागी भक्तांना आनंद मिळेल अशा ठेक्यांना अधिक पसंती मिळत आहे. सध्या गणेश उत्सवाचं नवरात्र सार्वजनिक मिरवणूक, जयंती मिरवणूक, पाडवा अशा विविध सणांना ढोल-ताशा पथकांची मागणी आहे.

डीजे डॉल्बी व लेझर लाईट शोच्या झगमगटापेक्षा पारंपारिक वाद्यांना मागणी वाढत आहे. ढोल-ताशा महाराष्ट्राची परंपरा, सांस्कृतिक श्रीमंती दर्शवणारी वाद्य परंपरा मानली जाते. महाराष्ट्रात सण, उत्सव, समारंभात ढोल-ताशा पथकाचा जल्लोष असतोच. या परंपरेला ऐतिहासिक वारसा आहे. राज्यातील सर्व प्रमुख शहरे आणि गावखेड्यांतही ढोल-ताशा पथके आहेत. शिवजयंती, गणेशोत्सव, नवरात्री उत्सव अशा उत्सवांत ढोल पथकांना विशेष महत्त्व असते. आता पुरुषांसोबत महिलांचीही ढोल पथके काही ठिकाणी आहेत. तसेच लहान मुलेही अशा पथकांमध्ये दिसतात. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू आहे. राज्यसह परराज्यातूनही आम्हाला मागणी येत आहे.
- मयूर वाळके, रणस्वराज्य ढोल पथक, कळंबोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com