शाळा महाविद्यालयांना सुट्टी

शाळा महाविद्यालयांना सुट्टी

Published on

खोपोली-खालापुरात संततधार
जनजीवन विस्कळित, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
खोपोली, ता. १९ (बातमीदार)ः खोपोली-खालापूर परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन काहीअंशी विस्कळित झाले आहे; पण लोकल सेवा तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत असल्याने नोकरदारवर्गाला मात्र दिलासा मिळाला.
खोपोली परिसरात ७४ मिमी एवढा पाऊस पडल्याची नोंद आहे. पाताळगंगा नदीसह उपनद्या भरून वाहत असल्याने नदीकाठच्या वस्ती, दरडप्रवण वस्तीला स्थानिक प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शहरात काही ठिकाणी झाडे पडणे, डोंगरावरची माती खाली येणे, अशा लहानसहान घटनांची नोंद आहे.
-----------------------------------
अतिउत्साही पर्यटकांवर लक्ष
पावसामुळे भातशेती बहरली असून तालुक्यातील सर्व पाणीसाठे, मोठे तलाव, धरणे भरली असल्याने पाणीटंचाईचे संकट टळणार आहे. मुसळधार पावसामुळे खोपोली परिसरातील सह्याद्री रांगांमधील सर्व धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटकांचा ओढा वाढण्याची शक्यता लक्षात घेता पालिकेची आपत्कालीन यंत्रणा साहसी, अतिउत्साही पर्यटकांवर लक्ष ठेवून आहे.
----------------------------------
खोपोली ः पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com