वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोलीत जनजीवन विस्कळीत
वज्रेश्वरी, ता. १९ (बातमीदार) : मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरीसह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. दर मंगळवारी वज्रेश्वरी येथे भरणाऱ्या आठवडी बाजाराला पावसाचा तडाखा बसला. बाजारपेठेत सर्वत्र पाणी भरल्याने बाजार हाट करणाऱ्या नागरिकांची त्रेधा तिरपट उडाली. भाजीविक्रेते भर पावसात उभे होते.
जोरदार पावसामुळे गणेशपुरी येथे मुख्य वीजवहिनीवर झाड कोसळल्याने येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसर अंधारात होते. वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. पारोळ वीज उपकेंद्राच्या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. तानसा नदीला महापूर आला असून, नदीने रौद्र रूप धारण केले आहे.
रस्ता गेला वाहून
पावसाच्या तडाख्यामुळे शिरसाड-वज्रेश्वरी रस्ता वाहून गेला आहे. शिरसाड-वज्रेश्वरी या मार्गावरील मांडवी, पारोळ फाटा, शिरवली मेढे, आंबोडे, सायवन, निंबवली, केलठन, भिवाली, गणेशपुरी, अकलोली कुंड येथील रस्त्याची पावसामुळे धूळधाण झाली आहे.
अपघाताची भीती
रस्त्यावरील दिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना प्रवास करताना इच्छितस्थळी जाण्यासाठी या खड्ड्यांमुळे विलंब लागत होता. परिणामी, अपघाताचा धोकाही निर्माण झाला होता.
वाहनचालकांची कसरत
भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून दरवर्षी येथे केवळ खडी व माती टाकून तात्पुरता रस्ता बंदिस्त केला जातो. परंतु पावसाच्या तडाख्यात हा रस्ता पुन्हा एकदा वाहून गेल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.