झोपडपट्टीतील रहिवाशांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील
झोपडपट्टीतील रहिवाशांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील
रोहा, ता. २० (बातमीदार) : शहरातील रायकर पार्क परिसरात अनेक वर्षांपासून कुटुंबे राहत असून, येथे झोपडपट्टी वसलेली आहे. या झोपडपट्टीचे नामकरण ‘श्री धावीर महाराज नगरी’ असे करण्यात आल्याने रहिवाशांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी नगरसेवक राजेंद्र जैन यांच्या पुढाकारातून झालेल्या या नामकरण सोहळ्यात उपस्थित राहून माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी फक्त नाव देऊन न थांबता येथील अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि रहिवाशांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
या छोटेखानी कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी झोपडपट्टीतील रहिवासी सौरभ चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, आत्माराम गोळे, सोपान गायकवाड, नामदेव धोत्रे, चंद्रकांत जाधव, सिंधू पवार, विमल जाधव, जया जाधव यांसह अनेकांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. रोहा शहरातील अनधिकृत घरांना शासनाच्या नियमानुसार मालकी हक्क देण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली असून, नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात १६ कुटुंबांना अधिकृत घरांचे प्रमाणपत्र देण्यात आले. मोरे आळी, हनुमाननगर, अष्टमी परिसरातील घरेदेखील या योजनेत प्रस्तावित असून, त्यांना अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनिकेत तटकरे यांनी सांगितले, की पावसाळ्यात नदीसंवर्धन संरक्षण भिंतीमुळे धोका काही प्रमाणात टळला असला तरी हा भाग सखल असल्याने पाणी साचण्याची शक्यता कायम असते. त्यामुळे गटार व्यवस्था सुधारून व संरक्षण भिंतीचे काम तातडीने हाती घेण्याचा प्रयत्न करू. या वेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर तसेच महेंद्र गुजर, महेश कोलाटकर, अहमद दर्जी, अमित उकडे, रुचिका जैन, महेश सरदार, मयूर खैरे, प्राजक्ता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात झोपडपट्टीतील महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.