मुंबई- गोवा महामार्गावरील आंबिवली फाटा येथे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे

मुंबई- गोवा महामार्गावरील आंबिवली फाटा येथे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे

Published on

आंबिवली फाटा येथे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे
मुंबई-गोवा महामार्गावरील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना होणार मदत
पेण, ता. १९ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पेणजवळील साई सहारा रेस्टॉरंट अंबिवली फाटा येथे अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याचे उद्‍घाटन सोमवारी (ता. १८) पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार, पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, तहसीलदार तानाजी शेजाळ, पोलिस निरीक्षक संदीप बागुल, वडखळ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे, दादर सागरी पोलिस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, साई सहारा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष कल्पेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
आत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना याची मदत होणार आहे. प्रवीण पवार म्हणाले, की मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून अपघातग्रस्तांसाठी धावून येणारे देवदूत कल्पेश ठाकूर यांनी स्वखर्चाने हे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसणार असून या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारी रोखण्यास पोलिस प्रशासनाला मदत होणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com