भरतनगरमधील १७० घरे पाण्याखाली

भरतनगरमधील १७० घरे पाण्याखाली

Published on

उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : मुसळधार पावसाने उल्हासनगरात अक्षरश: थैमान घातले आहे. अवघ्या काही तासांत १४७ मिलिमीटर पावसाची नोंद होताच कानसई रस्त्यावरील भरतनगर परिसर जलमय झाला. अंदाजे १७० घरांमध्ये पाणी शिरल्याने ५००हून अधिक नागरिकांना तातडीने स्थलांतरित करावे लागले. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक व अग्निशमन दलाने मदतकार्य हाती घेतले असून, नागरिकांसाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करून दिली.
उल्हासनगरात मंगळवारी (ता. १९) सकाळी पावसाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले. सकाळी १० वाजेपर्यंत शहरात तब्बल १४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून. यामुळे शहरातील विविध भागांत पाणी साचले आहे. सर्वाधिक गंभीर परिस्थिती कानसई रोड येथील भरतनगर परिसरात निर्माण झाली. येथे अंदाजे १७० घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती वस्तू व साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना घर सोडून बाहेर पडावे लागले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व प्रभाग समिती क्रमांक ४ च्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने मदतकार्य सुरू केले. धोकादायक स्थितीत अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. आतापर्यंत अंदाजे ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. स्थलांतरित झालेल्या नागरिकांना महापालिकेच्या समाज मंदिर व बुद्ध विहार येथे तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला. तसेच महापालिकेतर्फे चहा-पाणी व नाश्त्याची व्यवस्था करून त्यांची काळजी घेतली जात आहे.

प्रशासन सज्ज
पावसाची संतप्तधार कायम असल्यामुळे चारही प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी सतत गस्त घालत आहेत. धोकादायक भागांत विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने पूर्ण तयारी ठेवली आहे.

मुसळधार पावसामुळे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीवर महापालिका सतत लक्ष ठेवून आहे. पावसाने प्रभावित भागांत नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. त्यांच्यासाठी निवारा, चहा-पाणी व नाश्त्याची सोय केली आहे. नागरिकांचे जीवित व वित्तहानी टाळणे ही आमची प्राथमिकता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
-मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com