धारावीत ९० फुटी रस्त्यावर ट्रक उलटला
धारावीत ९० फुटी रस्त्यावर ट्रक उलटला
मिठी नदीचे पाणी शिरले वस्त्यांमध्ये
धारावी, ता. १९ (बातमीदार) : मुसळधार पावसामुळे धारावी ९० फुटी रस्त्यावर ट्रक उलटल्याची घटना मंगळवारी (ता. १९) घडली. ट्रान्झिस्ट कॅम्प क्रमांक १० व ११ मधील रस्त्यावर तांदळाने भरलेला ट्रक रस्त्यावरील चेंबरमध्ये अडकला. चेंबर खचून ट्रक रस्त्यावर आडवा झाला.
चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी मारल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ९० फुटी रस्ता धारावीतील वर्दळीचा रस्ता आहे; मात्र पावसामुळे पादचारी व वाहने तुरळक असल्याने मोठा अनर्थ टळला. धारावीतील अनेक विभागांत पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार घडले आहे. त्यातही सखल भागात थोडा जरी पाऊस पडला, की पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात होते.
धारावीतून मिठी नदी वाहते. नदीच्या काठावर प्रेमनगर व राजीव गांधीनगर या दोन मोठ्या वस्त्या आहेत. या दोन्ही वस्त्यांमध्ये मिठी नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले होते. पोलिसांनी व प्रशासनाने प्रसंगावधान राखत काही कुटुंबांना वस्त्यांमधून बाहेर काढल्याने पुढील धोका टळला आहे.
धारावी मुख्य रस्त्यावरील चमडा बाजार, शेटवाडी, संत कक्कया मार्गावरील शंकर कवडे चाळ, दगडी बिल्डिंग परिसर, ढिगला, शिवशक्तीनगर, शास्त्रीनगर, माटुंगा लेबर कॅम्प, कुंभारवाडा, ट्रांझिस्ट कॅम्प धोबीघाट, महात्मा गांधीनगर, संगमनगर, सोशलनगर आदी भागांत पावसाचे पाणी साचले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.