मुंबई
संरक्षक भिंत कोसळल्याने कारचे नुकसान
भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी महापालिका प्रभाग समिती क्रमांक तीन कार्यक्षेत्रातील मानसरोवर येथील बी वन या इमारतीची संरक्षक भिंत कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. या भिंतीचा ढिगारा भिंतीलगत उभ्या असलेल्या कारवर पडल्याने कारचे नुकसान झाले. घटनेप्रसंगी तिथे कोणी नसल्याने जीवितहानी टळली. माहिती मिळताच पालिकेच्या आपत्कालीन विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल होत ढिगारा काढण्यास सुरुवात केली.