मुंबई
एमआयडीसीतील रस्ते पाण्याखाली
एमआयडीसीतील रस्ते पाण्याखाली
तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातील उद्योगांचे केंद्र असलेल्या एमआयडीसीतील रस्त्यांना पावसाचा फटका बसला. विशेषतः नेरूळकडून तुर्भे, महापेकडून रबाळेकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली होती.
एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांच्या आवारात पाणी शिरले होते. आशियातील सर्वात मोठी आद्योगिक वसाहत म्हणून नावाजली गेलेली नवी मुंबईलगत असणाऱ्या ठाणे-बेलापूर इंडस्ट्रियल पट्ट्यातील अंतर्गत रस्ते पूर्ण पाण्याखाली गेल्याने नेरूळकडून तुर्भे आणि महापेकडून रबाळेकडे जाणारा मार्ग जवळपास बंद होता. तुर्भे, नेरूळ- शिरवणे भागातील एमआयडीसी भागात जाण्यासाठीचा रस्ता, महापेतून रबाळे-दिघाकडे जाणारा रस्ता आणि तुर्भेकडून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते.