शेजारील  व्यक्ती मदतीसाठी धावून आले नसते तर त्या कुत्र्यांनी मुलांचे लचके तोडले असते.

शेजारील व्यक्ती मदतीसाठी धावून आले नसते तर त्या कुत्र्यांनी मुलांचे लचके तोडले असते.

Published on

कुत्र्यांनी चिमुकल्याला घेराव घातला अन्...
शेजारील व्यक्ती मदतीसाठी धावून आले नसते तर त्या मुलांचे लचके तोडले
खारघर, ता. १९ (बातमीदार) : दहावर्षीय चिमुकल्याला पाच कुत्र्यांनी चोहोबाजूंनी घेरले. मुलाने मदतीसाठी आरडाओरडा करताच शेजारी धावून आले आणि चिमुकल्याचे प्राण बचावले. ही घटना सोमवारी (ता. १९) खारघर सेक्टर ३४ मध्ये घडली. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पालिकेने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
खारघर सेक्टर ३४ मधील ट्युलिप सोसायटीतील दहावर्षीय चिमुकला दुपारी शाळेतून घरी येत होता. या वेळी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या पाच कुत्र्यांनी त्याला घेरले. हे पाहून घाबरलेल्या मुलाने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. या वेळी शेजारील कृष्णा रेसिडेन्सीमधील एका रहिवाशाने मुलाचा आवाज ऐकून बाहेर पहिले असता कुत्र्यांनी घेरल्याचे निदर्शनास आले. हे पाहताच त्यांनी कोणताही विचार न करता धाव घेत त्या बालकाला कुत्र्यांच्या घोळक्यातून सोडविले. खाली पडल्यामुळे त्याचा गुडघा आणि पायाला दुखापत झाली आहे. सुदैवाने कुत्र्याने चावा घेतला नाही.

किरकोळ अपघाताच्या घटना
माहितीनुसार खारघर सेक्टर ३० ते ३५ या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावर घोळका करून बसलेले कुत्रे दुचाकींचा पाठलाग करतात. यामुळे किरकोळ अपघाताच्या घटनाही घडतात. खारघर परिसरात मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक निर्भयपणे वावरू शकत नाहीत. पालिकेने मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पावले उचलावी, अशी मागणी खारघरवासीयांकडून केली जात आहे.

नसबंदी आणि लसीकरण करणार
यासंदर्भात पालिकेच्या श्वान विभागाचे अधिकारी डॉ. बी. एन. गीते यांच्याशी संपर्क केला असता मोकाट कुत्र्यांना पकडून नसबंदी आणि लसीकरण केले जात आहे. खारघर सेक्टर ३४ परिसरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

माझ्या दोन्ही मुली मोकाट कुत्र्यांमुळे घाबरतात. अनेक वेळा कुत्र्यांची झुंड पाहून माघारी यावे लागले. एवढेच नव्हे तर अनेक वेळा दुचाकीचा कुत्र्यांनी पाठलाग केला आहे. पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
- मुरतुझा हबीबी, रहिवासी, खारघर

मोकाट कुत्र्याने एका शालेय विद्यार्थ्याला घेरल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात लवकरच पालिका आयुक्तांची भेट घेऊन मोकाट कुत्र्यांसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पालिका काय उपाययोजना करणार आहे, याचा जाब विचारणार आहे.
- प्रसाद परब, शहरप्रमुख शिवसेना खारघर

सहा महिन्यांत ४२६ जणांना मोकाट कुत्र्यांचा चावा
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार पालिका हद्दीत जवळपास २० हजार मोकाट कुत्रे आहेत. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ४२६ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. खारघरमध्ये दिवसाला दोन ते तीन जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com