एमआयडीसी, ठाणे-बेलापूर रस्ता पाण्याखाली

एमआयडीसी, ठाणे-बेलापूर रस्ता पाण्याखाली

Published on

एमआयडीसी, ठाणे-बेलापूर रस्ता पाण्याखाली
दिघ्यात घरांमध्ये पाणी, एपीएमसी मार्केट जलमय
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. १९ : शहरासह एमआयडीसी परिसराला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. शहरी भागात फारसे पाणी भरले नसले, तरी एमआयडीसी परिसर, ठाणे-बेलापूर रस्त्यावरील भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
दिघा येथील नामदेवनगर वस्तीमध्ये गुडघाभर पाणी साठल्याने जनजीवन विस्कळित झाले. सलग दुसऱ्या दिवशी एपीएमसी मार्केट पाण्याखाली होते. दिघ्यातील सेन्चुरी नाल्यालगतच्या १०० घरांमध्ये पाणी घुसले होते. नवी मुंबई महापालिकेने पंप लावून पाणीउपसा सुरू केल्यामुळे दुपारनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. सकाळी ९.१५ वाजून ३.७५ मीटरची भरती असल्याने काही सखल ठिकाणी भरती ओसरेपर्यंत पाणी साचल्याचे निदर्शनास आले. यादवनगर आदिवासी पाडा, ट्रक टर्मिनल खोल भागात लगतच्या डोंगरावरील पाणी साचल्याने जेसीबी लावून पाण्याचा प्रवाह नाल्यांकडे प्रवाहित करण्यात आला. महापे मिलिनियम बिझनेस पार्कसमोर, एमआयडीसी भागात ड्रेबिजमुळे पाणी तुंबले होते. तुर्भे एमआयडीसी मुख्य रस्ता इंदिरानगर, घणसोली नौसिल नाका ब्रिजजवळील मुख्य रस्त्यावरील कॉर्नर, ऐरोली भारत बिजलीजवळील कॉर्नर, कृष्णावाडी दिघा, कृष्णा स्टील झोपडपट्टी परिसरात पाणी साचल्याची नोंद आहे.
----------------------------------
विक्रमी पावसाची नोंद
१९ ऑगस्ट - ८९.५६ मिमी.
१८ ऑगस्ट - १८५.०२ मिमी.
१५ ऑगस्ट - ५४०.५७ मिमी.
----------------------------
महापालिकेची यंत्रणा तैनात
- कोपरखैरणे-महापे भुयारी मार्गातील वाहनांमधील पाच व्यक्तींना बाहेर काढले.
- रिलायन्स एम्पायर टॉवरजवळील नाल्यात म्हशीला वाचविण्यात यश
- तुर्भे कृष्णा स्टील झोपडपट्टी भागात ९० हून अधिक नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर
- ऐरोली से. ८ ए तुळजाभवानी मंदिराजवळ, वाशी से. ९ अभय सोसायटीजवळ, नेरूळ डीएव्ही स्कूलजवळ, नेरूळ से. १६ गुरुकुल सोसायटीजवळ, से. ३६ करावे गाव ज्ञानदीप शाळेजवळ झाडे पडल्याने रहदारीत अडथळे निर्माण झाले होते.
--------------------------
शाळा बंद, कार्यालये सोडली
ठाणे जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाल्याने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा मंगळवारी (ता. १९) शाळा बंद होत्या. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार नवी मुंबई महापालिका कार्यालयातील अत्यावश्यक, आपत्कालीन सेवा वगळता इतर कार्यालयांमध्ये बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसानंतर सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com