उल्हासनगरात बस आगारातील आठ झाडांचे प्रत्यारोपण
उल्हासनगर, ता. २० (बातमीदार) : उल्हासनगर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक उपक्रम राबवत बस आगाराच्या प्रवेशद्वारावर अडथळा ठरणाऱ्या आठ मोठ्या झाडांचे प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. जेसीबी मशीनच्या साह्याने ही झाडे मुळासकट काढून बस आगाराच्या आतील जागेत पुन्हा लावण्यात आली.
अँटेलिया बस आगाराच्या प्रवेशद्वारावर गुलमोहर व पामट्रीचे एकूण आठ वृक्ष होते. या झाडांमुळे आगारात प्रवेश करणे कठीण होत होते आणि दुसरा मार्गही उपलब्ध नव्हता. यामुळे झाडे कापण्याऐवजी त्यांचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स्नेहा कर्पे व जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी ही प्रक्रिया राबवली. प्रत्यारोपणासाठी ‘ऋषीकेश गार्डन’ या कंपनीची मदत घेण्यात आली. परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान विभाग व अग्निशमन दल यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही झाडे मुळासकट सुरक्षितपणे काढण्यात आली. झाडांच्या मुळांना पुन्हा उगम येण्यासाठी विशेष प्रकारचे रसायनही वापरण्यात आले.
मोठ्या झाडांना मुळासकट काढून पुन्हा लावण्याचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. त्यामुळे आठ वृक्ष वाचवण्यात महापालिकेला यश आले, अशी माहिती आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली. सरकारच्या १५० दिवसांच्या अभिनव उपक्रमांतर्गत ‘वृक्ष प्रत्यारोपण’ समाविष्ट करून पर्यावरणपूरक विकास साधण्याचे काम सुरू असल्याचे जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.