सेवादल आळीवर बसणार ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर
सेवादल आळीवर बसणार ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर
रोहा, ता. २० (बातमीदार) : रोहा शहरातून मुरूड आणि इतर पर्यटनस्थळी जाणाऱ्या मार्गावरील सेवादल आळी परिसर नेहमीच गजबजलेला असतो. येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर संवेदनशील मानला जातो. आता या आळीवर ‘तिसऱ्या डोळ्याची नजर’ ठेवली जाणार असून, संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कव्हऱ्हेजमध्ये येणार आहे.
कै. जनार्दन मारुती शेडगे ट्रस्टच्या वतीने माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या हस्ते सेवादल आळी सन्मित्र मंडळाला आठ सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी आळीतील श्री गणेश मंदिरात छोटेखानी कार्यक्रम घेऊन कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी मंडळाकडून समीर शेडगे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कॅमेऱ्यांच्या स्थापनेमुळे परिसरातील सुरक्षेत मोठी भर पडणार आहे. चोरी, भांडण, अपघात किंवा अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना पुरावे मिळणे सोपे होईल. तसेच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गर्दीच्या काळात वाहतूक व्यवस्थापनासाठीही सीसीटीव्ही उपयुक्त ठरणार आहेत. याप्रसंगी बोलताना समीर शेडगे म्हणाले, “कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इच्छाशक्ती व उत्साह ही दोन तत्त्वे अत्यावश्यक असतात. मंडळातील तरुणाईने हे दोन्ही गुण दाखवून दिले आहेत. त्यामुळेच हा उपक्रम शक्य झाला. याबद्दल मी सर्वांचे मनापासून कौतुक करतो.” कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष मोहीत ताम्हणे, उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी यांच्यासह दिलीप मेकडे, रवींद्र मगर, रमेश कुलकर्णी, सुधीर गोळे, प्रफुल्ल ताम्हणे, संदीप सावंत, हरी मेकडे, विजय सावंत, संजीव कुलकर्णी, सुनील दळवी, विशाल दांडगवाळ, केदार मेकडे, संदेश कापसे, गणेश दिघे, सचिन भगत आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांचीही मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले. या उपक्रमामुळे सेवादल आळी परिसरातील रहिवासी आणि पर्यटक दोघांनाही अधिक सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे. आगामी गणेशोत्सव, नवरात्र आणि इतर सणांच्या गर्दीत याचा विशेष फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.