महामंगळागौर स्पर्धेतून जनजागृती

महामंगळागौर स्पर्धेतून जनजागृती

Published on

महामंगळागौर स्पर्धेतून जनजागृती
कल्याण, ता. २० (बातमीदार) : मातोश्री गुंजाई फाउंडेशन व समस्त महिला आघाडी आयोजित लाडक्या बहिणींची महामंगळागौर स्पर्धा मंगळवारी (ता. २०) पूर्वेतील मंगल राघोनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. पारंपरिक वेशभूषा, मंगलगीतांच्या तालावर महिलांनी सादर केलेल्या खेळ आणि नृत्यांनी संपूर्ण सभागृह रंगून गेले होते. याच स्पर्धेतून महिलांनी सामाजिक ऐक्याचा संदेश देत स्त्रियांचे जीवन अधोरेखित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आयोजित स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत उत्साह, आनंद आणि ऐक्याचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिकतेसोबतच स्नेह, हशा आणि आनंदाचा सुरेख मिलाप झाल्याने हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. स्पर्धेच्या शेवटी विजेत्या महिलांना बक्षीस वितरणही केले. ज्यामुळे उत्साहाला आणखीन रंग चढला. आजची स्त्री ही कशाप्रकारे जीवन जगत आहे. हे सहभागी महिलांनी आपल्या खेळातून हातात पोस्टर्स घेऊन समाजाला दाखवून दिले. यात स्त्रीची विविध रूपे आणि जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com