सणासुदीसाठी पालघर पोलिस दल सज्ज

सणासुदीसाठी पालघर पोलिस दल सज्ज

Published on

पालघर, ता. २४ (बातमीदार) : जिल्ह्यात गणेशोत्सव, गौरी उत्सव व ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहाने साजरे होतात. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पालघर पोलिस दल सज्ज आहे.

पालघर जिल्ह्यात एकूण ९,७७६ घरगुती गणेशमूर्ती, तसेच एक हजार ९१२ सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे, तसेच ७०४ घरगुती आणि १४२ सार्वजनिक गौरी उत्सव साजरा होणार आहे. त्याचप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा होणार आहे. आगामी गणेशोत्सव, गौरी उत्सव, तसेच ईद-ए-मिलाद सणाचे अनुषंगाने पालघर जिल्ह्यात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकरिता पालघर पोलिस दलाकडून सुरक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

एक अप्पर पोलिस अधीक्षक, चार उपअधीक्षक, ६७ अधिकारी, ७३२ अंमलदार, ५०० होमगार्ड, ५० वाहतूक अंमलदार, उपविभागीय अधिकारी यांचे चार स्ट्राइकिंग फोर्स, दोन दंगल नियंत्रण पथक, दोन जलद कृती दल व एक राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com