धूप-अत्तराचा गंध, सोबतीला भक्तिभावाचा आनंद

धूप-अत्तराचा गंध, सोबतीला भक्तिभावाचा आनंद
Published on

धूप, अत्तराचा सर्वत्र दरवळ
गणेशोत्सवानिमित्त पूजा साहित्य विक्री
पनवेल, ता. २४ (बातमीदार)ः गणरायाच्या आगमनाला अवघे दोनच दिवस उरले आहेत. घरोघरी गणरायाच्या स्वागताची जय्यत सुरू आहे. मखराची सजावट, रोषणाईसोबत नियमित पूजेसाठी लागणाऱ्या धूप, अत्तराचा दरवळ बाजारात घुमू लागला आहे.
गणपती बाप्पा घरी किंवा मंडळात येण्याआधी जशी सजावटीची तयारी होते तशीच विधिवत प्रतिष्ठापनेसाठी आणि रोजच्या पूजेसाठीच्या साहित्यासाठीची खरेदीसुद्धा सुरू होते. पनवेल शहरात पूजेच्या साहित्याचे स्टॉल ठिकठिकाणी मांडण्यात आले आहेत. प्रतिष्ठापनेसाठी पूजा साहित्याचे पॅकेज बॉक्स बाजारात दाखल झाले आहेत. पॅकेजमध्ये हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, अष्टगंध, शेंदूर, कापूर, जानवी, उदबत्ती, अत्तर, पाच सुपारी, खारीक, बदाम, कापूस वम्ब फुलवात समवात, रांगोळी, मध अशा वस्तू असतात. यंदाही बाजारात मोगरा, केवडा, केशरचंदन, पारिजातक, हिना अशा विविध गंधाच्या अगरबत्ती उपलब्ध आहेत. अगरबत्ती १० रुपयांपासून २०० रुपये, कापूर १० रुपये, धूप बॉक्स ते १५० रुपये, वस्त्र १० ते ५० रुपये, शेंदूर २० रुपयांपासून उपलब्ध आहे.
------------------------------------
आसनांमध्ये असंख्य प्रकार
प्राणप्रतिष्ठा करताना गणेशाला जानवे, कापसाचे वस्त्र अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे वस्त्रमाळ, वेलवेट, रेशमी कापडापासून बनवलेले भरजरी वस्त्रंही बाजारात उपलब्ध आहेत. सोनेरी रंगाची एम्ब्रॉयडरी केलेल्या, मणी आणि लेस लावलेल्या या वस्त्रांमध्ये अनेक रंगसंगती उपलब्ध आहेत. काही इंचाच्या आकारापासून ते दोन ते तीन चौरस फुटांपर्यंत ही वस्त्रे उपलब्ध आहेत.
------------------------------------
सध्याचे दर पूर्वी आता
नारळ ३० ४० -५० रुपये नग
सुपारी ४५० ५२० रुपये किलो
कापूर १,२०० १,६०० रुपये किलो
वात १५ २० ते २५ रुपये पाकीट
अष्टगंध ४० ६० रुपये डबी
अगरबत्ती १६० ४०० रुपये किलो
----------------------------------------------
गणेशोत्सवात पूजेच्या साहित्यात दरवाढ झाली आहे. परंतु ग्राहक मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करीत आहेत. हल्ली धावपळीच्या जगात गणेशोत्सवाच्या तयारीसाठी कमी वेळ मिळतो. अशा वेळी पूजा साहित्य एकाच ठिकाणी मिळते.
- अमोल येवले, श्रीकृष्ण पूजा वस्तू भंडार, कळंबोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com