पनवेलकरांकडून कागदी गणपतींना पसंती
पनवेलकरांकडून कागदी गणपतींना पसंती
नव्या उपक्रमातून पर्यावरण जपण्याचा संदेश
पनवेल, ता. २४ (बातमीदार) ः पनवेलमध्ये कागदी गणपतींचा नव्या पर्यावरणपूरक उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
गणेशोत्सव म्हटला की भक्तिभाव, आनंद, सजावट आणि बाप्पाची आरास या सगळ्यात वेगळाच उत्साह अनुभवायला मिळतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींमुळे जलप्रदूषण वाढले आहे. विसर्जनानंतर या मूर्तींतून जलस्रोतांमध्ये रसायनांचे मिश्रण होते. यामुळे मासे, जलीय वनस्पती यांचा नाश होतो आणि पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा पनवेलकरांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा नवा उपक्रम राबवला आहे. तळोजा येथील नितळस गावातील तरुण प्रतीक मोरेश्वर पवार यांनी जुन्या कागदाचा पुनर्वापर करून १० फूट उंची व सुमारे ७० ते ८० किलो वजनाच्या गणेशमूर्ती घडवल्या आहेत. या मूर्ती हलक्या असून, वाहतुकीस सोप्या आहेत. या विसर्जनानंतर पाण्यात सहज विरघळतात. त्यामुळे जलप्रदूषण होत नाही. उलट विसर्जनानंतर पाण्याची स्वच्छता राखण्यास हातभार लागतो. या उपक्रमाला पनवेलकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक मंडळांनी तसेच पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांनी यंदा फक्त कागदी मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा संकल्प केला आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले, की कागदी गणपती मूर्ती हा भविष्यातील उत्तम पर्याय आहे. त्यातून आपण गणेशोत्सवाचा आनंद घेत असताना पर्यावरण जपण्याचा संदेशदेखील देतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.