प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांना ''भाव'',

प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांना ''भाव'',

Published on

प्लॅस्टिकच्या फुलांना ‘भाव’
बंदीची घोषणा हवेतच
वाशी, ता. २५ (बातमीदार) : बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागताच सजावटीच्या नवी मुंबईतील बाजारात चैतन्य आले आहे. दरम्यान, या चैतन्यावर प्लॅस्टिकच्या फुलांनी नैसर्गिक सौंदर्याला, सुगंधाला ग्रहण लावले आहे. राज्य सरकारने प्लॅस्टिक फुलांवर बंदीची घोषणा करूनही बाजारपेठा आजही याच कृत्रिम फुलांनी ओसंडून वाहत आहेत. एकीकडे आकर्षक प्लॅस्टिक फुलांचा व्यवसाय तेजीत असताना दुसरीकडे वर्षभर घाम गाळून खरी फुले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची स्वप्ने मात्र कोमेजून चालली आहेत.
प्लॅस्टिक फुलांमुळे स्थानिक फुलशेती, मधमाशी पालन आणि पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, यावर बंदी घालण्याची मागणी विधानसभेत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात केली. फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनीही कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची घोषणा केली. प्लॅस्टिक फुलांच्या वाढत्या वापरामुळे खऱ्या फुलांची मागणी घटली असून, राज्याचा हजारो कोटींचा फुलशेती व्यवसाय धोक्यात आला आहे, असे गोगावले यांनी मान्य केले. मात्र या बंदीच्या घोषणेने बाजारातील चित्र बदललेले नाही. गणेशोत्सवाच्या तोंडावर विक्रेते मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक फुलांची विक्री करीत आहेत, तर ग्राहकही त्याकडेच आकर्षित होत आहेत. नाशिक, पुणे, सातारा आणि सांगलीसारख्या जिल्ह्यांतील हजारो शेतकरी हरितगृहांमध्ये वर्षभर मेहनत घेऊन फुले पिकवतात. मात्र बाजारात खऱ्या फुलांना मागणीच उरली नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून सुरू केलेली फुलशेती आता तोट्यात गेल्याने त्यांनी इतर पिकांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. आम्ही वर्षभर राबून फुले पिकवतो. पण लोकांच्या नजरेत आता प्लॅस्टिकच्या फुलांचीच किंमत वाढली आहे. खऱ्या फुलांचा सुगंध कुणी अनुभवायलाच तयार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com