बंदपथदिव्यामुळे सोसायटी आवारात सरपटणाऱ्या जनावरांचा धोका वाढला !

बंदपथदिव्यामुळे सोसायटी आवारात सरपटणाऱ्या जनावरांचा धोका वाढला !

Published on

बंद पथदिव्यांमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका!
नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी; पालिकेकडून दुर्लक्ष
अंबरनाथ, ता. २५ (वार्ताहर) ः शहरातील अनेक सोसायट्यांमधील बंद पडलेले पथदिवे आता धोक्याचे कारण ठरत आहेत. रात्री अंधाराचे साम्राज्य असल्याने साप, विंचू यांसारखे प्राणी सहजपणे आवारात शिरत आहेत. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही पथदिवे मात्र बंदच आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यावरच पालिकेला जाग येईल का, असा संतप्त प्रश्न रहिवासी विचारत आहेत.
अंबरनाथ पालिका हद्दीत गेल्या अनेक महिन्यापासून पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. या पथदिव्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी, समाजसेवक व नागरिकांनी मागणी करूनही पथदिवे मात्र जैसे थे असून, बारकुपाडा रोड येथील उपरोल सोसायटी, परिजात व परिवास या सहकारी सोसायटीसमोरील एकूण आठ पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, तर पावसाळा सुरू असल्याने आता परिसरात गवतही वाढले आहे. त्यामुळे जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांची भीतीदेखील दिवसेंदिवस वाढत आहे. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

पालिकेकडून हवे आश्वासन
पथदिवे नसल्याने अंधारामुळे नागरिकांना रात्री उशिरा घराबाहेर पडणेही धोकादायक झाले आहे. विशेषतः मुलं व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती चिंताजनक बनली असून, नगर परिषदेकडून वारंवार लवकरच दिवे सुरू होतील, अशा आश्वासनांची बरसात होत असली तरी प्रत्यक्षात मात्र समस्या तशीच कायम आहे. त्यामुळे पालिकेला एखाद्याचा बळी गेल्यावरच जाग येणार का, असा संतप्त प्रश्न रहिवासी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com