मुरबाड काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर

मुरबाड काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर

Published on

मुरबाड, ता. २८ (वार्ताहर) : मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीची जम्बो कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वाखालील या कार्यकारिणीला जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी मान्यता दिली आहे. भिवंडी येथे रविवारी (ता. २५) झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली.
जुलै महिन्यात हर्षवर्धन सकपाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चेतनसिंह पवार यांची मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी तालुका कार्यकारिणीची नवीन यादी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे मान्यतेसाठी पाठवली. आता ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. कार्यकारिणीत ५० पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. वालीवऱ्हे ते पोटगाव आणि रामपूर ते पाटगाव अशा संपूर्ण तालुक्यातील प्रतिनिधींना यात स्थान देण्यात आले आहे. अनंत चतुर्दशीनंतर पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देणार असल्याचे तालुकाध्यक्ष पवार यांनी स्पष्ट केले.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे
वरिष्ठ तालुका उपाध्यक्षपदी पांडुरंग शिंगोळे, बंधू बेलवले आणि भरत विशे यांची निवड झाली आहे. कोषाध्यक्षपदी नेताजी लाटे, तर तालुकाउपाध्यक्षपदी जयवंत हरड, गुरुनाथ देशमुख, मोरेश्वर भोईर आणि कांताराम भला यांची नेमणूक झाली आहे. सरचिटणीसपदी मारुती टोहके, गोविंद शेलवले, मार्तंड आगिवले, रजाक शेख, वसंत जमदरे, सागर गायकवाड, काळूराम गोंधली आणि नरेश कुर्ले यांचा समावेश आहे. समन्वयकपदी काळूराम विशे, तर संघटकपदी दामोदर भला, हरिश्चंद्र पष्टे, अंकुश धुमाळ, भरत पवार आणि दशरथ चौधरी यांची निवड झाली आहे. सचिवपदी बिपिन भावार्थ, प्रकाश हिंदुराव, भगवान तारमले, संजय विशे, दीपक आलम, दिनकर गायकर आणि दिलीप शेळके यांना स्थान मिळाले आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून सिराज अत्तार, नामदेव कराले, वसंत शेलवले, मोहन वाघ, स्वप्निल जाधव आणि हरेश वाघ यांची नेमणूक झाली आहे.

मंडळप्रमुखांची निवड
मंडळप्रमुख म्हणून विठ्ठल ठमके (असोले), गुरुनाथ वडवले (देवगाव), समीर ठाकरे (कुडवली), सचिन धुमाळ (शिवळे), अजय शेळके (सरळगाव), अमोल सूर्यराव (किसळ), अनंत तिवार (वैशाखारे), जयराम उघडा (माळ), पांडुरंग शीद (तळेगाव), कुणाल पवार (फांगुलगव्हाण), विपुल सुरोशे (धसई), वसंत कराळे (खोपिवली), गणेश गायकर (डोंगरन्हावे), बालाराम मार्के (म्हसा) आणि निलेश आगवले (शिरवली) यांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com