उल्हासनगर टीडीआर घोटाळ्याबाबत मंत्रालयात बैठक

उल्हासनगर टीडीआर घोटाळ्याबाबत मंत्रालयात बैठक

Published on

उल्हासनगर टीडीआर घोटाळ्याबाबत मंत्रालयात बैठक
व्यवहार व बांधकाम परवानग्या स्थगित; नगरविकास विभागाचे आदेश

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या गाजलेल्या टीडीआर घोटाळ्यावर अखेर मंत्रालयीन स्तरावर मोठा निर्णय घेण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नगरविकास विभागाने उल्हासनगर महापालिकेला कडक निर्देश देत टीडीआर/डीआरसी क्रमांक १४, १७ आणि १८ तत्काळ स्थगित करण्याचा आदेश दिला. घोटाळ्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही व्यवहार, परवानग्या वा खरेदी-विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

उल्हासनगर शहरातील गाजलेल्या टीडीआर घोटाळ्याला राज्य सरकारने अखेर गांभीर्याने घेतले असून मंत्रालयात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांना स्पष्ट शब्दात आदेश दिले, की टीडीआर/आरसीसी/डीआरसी क्रमांक १४, १७ आणि १८ संबंधित सर्व व्यवहार तत्काळ स्थगित ठेवावेत. तसेच या टीडीआरची खरेदी-विक्री थांबवण्याचे निर्देश दिले असून, जर या टीडीआरवर आधारित काही बांधकामांना परवानगी दिली असेल तर त्या परवानग्यांनाही स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी बैठकीत स्पष्टपणे मान्य केले, की उल्हासनगरमध्ये टीडीआर घोटाळा घडला आहे. हा घोटाळा तक्रारदार प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांच्या प्रयत्नांमुळे उघडकीस आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना फटकारत विचारले, की जेव्हा एका समाजसेवकाने हा घोटाळा उघड केला, तेव्हा आमचे अधिकारी काय करीत होते? त्यांना ही बाब आधी का लक्षात आली नाही? या वेळी त्यांनी आश्वासन दिले, की केवळ दहा दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

महत्त्वाच्या बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख हितेश जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील, राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी, समाजसेवक वासू कुकरेजा, अवर सचिव निर्मलकुमार चौधरी, सचिव मोरे तसेच उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com