महापालिका क्षेत्रात पाच दिवसांच्या गणपतींचे भावपूर्ण विसर्जन
महापालिका क्षेत्रात पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन
८१ टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांत
विरार, ता. २ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या जल्लोषात व भावपूर्ण वातावरणात पार पडले. गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी (ता. ३१) पाच दिवसांच्या ७७५० घरगुती व ५४३ सार्वजनिक अशा एकूण ८,२९३ गणरायांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी ६,३१८ घरगुती व ४०५ सार्वजनिक अशा एकूण ६,७२३ गणेशमूर्तींचे विसर्जन हे पालिकेच्या कृत्रिम तलावांत करण्यात आले. एकूण ८१% मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांत झाले.
आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व दीपक सावंत यांच्या देखरेखीखाली महापालिकेमार्फत यावर्षी मूर्ती विसर्जनासाठी एकूण ११६ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून सहा जेट्टींच्या ठिकाणी व दोन बंद दगडखाणींच्या ठिकाणीही विसर्जनाची सोय करण्यात आली होती. प्रत्येक प्रभागात दोन फिरते हौद याप्रमाणे मूर्ती विसर्जनासाठी नऊ प्रभागांमध्ये १८ फिरते हौद उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विसर्जनस्थळी नागरिकांच्या सोयीसाठी मंडप व्यवस्था, आरती स्थळे, दिवाबत्ती सोय, मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य कलश, वैद्यकीय मदत कक्ष इ. आवश्यक सर्व उपाययोजना महापालिकेमार्फत करण्यात आल्या होत्या. किल्लाबंदर जेट्टी येथे विसर्जनासाठी जाण्या-येण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विसर्जनावेळी महापालिकेमार्फत नरवीर चिमाजी अप्पा स्मारक ते किल्लाबंदर जेट्टीपर्यंत मोफत बससेवा पुरविण्यात आली आहे. महापालिकेची तसेच पोलिस विभागाची यंत्रणा विसर्जनाच्या ठिकाणी भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी तत्परतेने कार्य करीत असून महानगरपालिकेचे दोन्ही अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिकेचे सर्व उप-आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख, अग्निशमन कर्मचारी आणि इतर कर्मचारी वर्ग प्रभागनिहाय विसर्जनस्थळी हजर राहून विसर्जन प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करीत होते. महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या विसर्जनाच्या सोयीसुविधांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करीत महापालिकेची प्रशंसा केली.
चौकट
पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन
कृत्रिम तलाव
घरगुती - ६,३१८
सार्वजनिक - ४०५
एकूण - ६,७२३
चौकट
नैसर्गिक स्रोत, जेट्टी
घरगुती - १,४३२
सार्वजनिक - १३८
एकूण - १,५७०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.