कर्जत पोलिसांचा राजस्थानात धडक, दोन सराईत गुंड अटकेत : दहा लाखांची इनोव्हा कार हस्तगत
कार चोरीचे राजस्थानपर्यंत धागेदोरे
कर्जत पोलिसांकडून दोघा सराईतांना अटक
कर्जत, ता. ४ (बातमीदार) : शहरातून चोरलेली कार राजस्थानमधून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अवघ्या १४ दिवसांत छडा लावताना कर्जत पोलिसांनी दोघा सराईत गुंडांना अटक केली आहे.
कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सद्दाम मिस्त्री यांच्या शोरूमजवळील कार २१ ऑगस्टच्या रात्री चोरण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्जत पोलिसांनी कार चोरीची पद्धत पाहता गुन्हेगारांची ओळख पटवली होती. रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही चित्रण स्पष्ट नसल्याने आरोपींची ओळख पटवणे आव्हानात्मक होते. तरीही तपास पथकाने कर्जत, कडाव, कशेळे, नेरळ, चौक, खालापूर, खोपोली परिसरातील शेकडो सीसीटीव्हींची पाहणी केल्यानंतर खात्रीशीर माहितीनंतर राजस्थानमधील बाडमेर आणि जालौर जिल्ह्यातून ओम प्रकाश बिश्नोई (३४, रा. मोखवा खुर्द, बाडमेर), अशोककुमार बिश्नोई (४७, रा. करडा, जालौर) या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीची कार जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींना ३ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण तपास मोहिमेत संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे, पोलिस शिपाई सुशांत वरक, पोलिस हवालदार संतोष खाडे, स्वप्नील येरुणकर, सागर शेवते, विठ्ठल घावस यांनी विशेष परिश्रम घेतले.
-------------------------------------------
१७ हून अधिक गंभीर गुन्हे
अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर राजस्थानमध्ये हत्येचा प्रयत्न, चोरी, फसवणूक, बनावट कागदपत्रे, खंडणी, गंभीर दुखापत, बलात्कार आणि अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत १७ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी अशोककुमारने सात वर्षांची शिक्षा भोगलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.