गणरायाच्या जयघोषाने मिरवणुकीमध्ये उत्साह

गणरायाच्या जयघोषाने मिरवणुकीमध्ये उत्साह

Published on

विक्रमगड (बातमीदार) : तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती मूर्तींना भक्तांनी प्रेमाचा भावपूर्ण निरोप दिला. चालक मालक मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी चौक मंडळ, शिव शक्ती जागृती मंडळ व दगडीचाळ गणेश मंडळाच्या विक्रमगडच्या राजाला ढोल-ताशा, बॅंजो, पारंपरिक नृत्यासह जयघोष करत विसर्जन करण्यात आले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत गणरायांना निरोप दिला.

विसर्जनाकरिता आंबेघर नदीपर्यंत विसर्जन मिरवणुका आयोजित केल्या होत्या. नगर पंचायत प्रशासनाने नदीतीरावर रोषणाई भक्तांचे स्वागताकरिता तयारी केली होती. रात्रीच्या वेळी विसर्जनाकरिता विजेची व्यवस्था केली होती. तसेच पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, १० दिवसांच्या गणरायाला उत्साहाच्या वातारणात निरोप देण्यात आला.

Marathi News Esakal
www.esakal.com