जिल्हयात साखरचैथ गणेशोत्सवाची जय्यत तयारी
कष्टकऱ्यांचा आज आनंद सोहळा
जिल्ह्यात साखरचौथ गणेशोत्सवाची जय्यत तयारी
अलिबाग, ता. ९ (वार्ताहर)ः रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर तालुक्यात साखरचौथ गणेश आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. कष्टकऱ्यांचा गणराय अशी ओळख असलेल्या या उत्सवाची गेल्या दशकभरात क्रेझ वाढली असून, बुधवारी (ता. १०) विविध भागांमध्ये जवळपास ९२८ गणरायांचे वाजत-गाजत आगमन होणार आहे.
अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पहिल्या संकष्ट चतुर्थीला साखरचौथ (साखरचतुर्थी) साजरा केला जातो. या गणपतींना गौरा गणपती असेही म्हटले जाते. आगरी, कोळी समाजबांधव साखरचौथ गणेशोत्सव दिमाखदार पद्धतीने साजरा करतात. दीड दिवसाचा हा सोहळा प्रेक्षणीय असतो. गणेशोत्सवाची समाप्ती झाल्यानंतर येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला साखरचौथ गणरायांची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. पेणमधील मूर्तिकारांना उत्सवात सहभागी होता येते. त्यामुळे मूर्तिकारांना गणेशोत्सवानंतर साखरचौथ गणराय, नवरात्री उत्सवातील नवदुर्गेच्या मूर्ती अतिरिक्त व्यवसायाची संधी मिळते.
---------------------------
पोलिसांची कुमक तैनात
रायगड जिल्ह्यात ४०२ सार्वजनिक व ५२६ खासगी गणरायांचे आगमन बुधवारी होणार आहे. रायगड पोलिस प्रशासनाने उत्सवासाठी बंदोबस्त ठेवला आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी ६९ पोलिस अधिकारी, ४५३ पोलिस अंमलदार, दोन आरसीपी, एक क्यूआरटी, ११ स्ट्रायकींग, ५८ वाहतूक अंमलदारांची कुमक तैनात ठेवण्यात आली आहे.
-------------------------
एकूण गणपती : ९२८
सार्वजनिक : ४०२
खासगी : ५२६
---------------------------------
‘गौरा-गणपती’ नावाने ओळख
गेल्या काही वर्षांपासून साखरचौथ गणेशोत्सवाची क्रेझ वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अगदी ठरावीक ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेषतः आगरी, कोळी समाजबांधव हा उत्सव साजरा करायचे, मात्र आता घरोघरी गणरायाचे आगमन होत आहे. या उत्सवाला आगरी, कोळी समाजबांधव ‘गौरा-गणपती उत्सव’ असेही संबोधतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.