चौकाला नेत्यांची नावे देण्यास भूमिपुत्रांची हरकत
सीएसएमटी रेल्वेस्थानकासमोरील चौकाला नेत्यांची नावे देण्यास भूमिपुत्रांची हरकत
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : मराठा आरक्षण आंदोलन पार पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील चौकाला मनोज जरांगे पाटील चौक असे नाव देण्याची मागणी काही संस्थांनी केली होती. या मागणीला आगरी-कोळी बांधवांनी तीव्र विरोध केला आहे.
आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाचे सल्लागार मोरेश्वर पाटील म्हणाले, इंग्रज राजवटीत मुंबई टर्मिनस आहे, त्याच जागी १७३७ पूर्वी आमच्या मुंबादेवीचे मंदिर होते. इंग्रजांनी बेदरकारपणे मुंबाआईचे मंदिर पाडले. त्या काळच्या विचारवंतांनी भुलेश्वर येथे मंदिर बांधून देवीची पुनर्स्थापना केली. इंग्रजांनी येथे रेल्वेसाठी मोठी इमारत बांधली. इंग्लंडची राणी व्हिक्टोरीयाचे पुतळे उभारले. अखेर ब्रिटिशांना सत्ता सोडून जावे लागले. मुंबई मार्गेच त्यांची शेवटची तुकडी भारतातून निघून गेली. पृष्ठभागावर दिमाखाने बसवलेला राणीचा पुतळाही चोरीस गेला. आता ती जागा रिकामीच आहे.
आमची देवी सत्वाची आहे. मुंबाआईच्या नावानेच या शहराला मुंबई नाव मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथील ही जागा आई मुंबादेवीचे मूळस्थान आहे, याची जाणीव असावी. येथील जागेला, चौकाला जरांगे पाटील यांचे अथवा कोणत्याही नेत्याचे नाव लावू नये, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच मुंबादेवीचा इतिहास असलेला फलक रेल्वेस्थानकात लावावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.