विजेवरील गाड्या आता तासाभरात फुल्ल चार्ज होणार
विजेवरील गाड्या आता तासाभरात फुल चार्ज होणार
टाटा पॉवरकडून विमानतळानजीक मेगा चार्जिंग हब
मुंबई, ता. ९ : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सध्या विजेवरील वाहनांच्या (ईव्ही) वापरात झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर टाटा पाॅवरने मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक अत्याधुनिक मेगा चार्जिंग हब उभारले असून, त्याचे आज मंगळवारी (ता. ९) उद्घाटन करण्यात आले. एका वेळी १६ वाहने चार्ज करण्याची व्यवस्था असलेल्या या चार्जिंग स्टेशनवर अवघ्या ४०-५० मिनिटांत गाडीची बॅटरी फुल चार्ज करता येणार आहे. त्यासाठी १२० किलोवॉटचे चार्जर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित वाहनधारकांच्या गाडी चार्ज करण्याच्या वेळेत मोठी बचत होईल.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या गाड्या चार्ज करण्यासाठी पुरेशी चार्जिंग स्टेशन नाहीत. त्यामुळे चार्जिंगसाठी दोन-तीन तास एवढा वेळ लागत असल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. त्याची दखल घेत टाटा पाॅवरने मुंबई विमानतळानजीक प्रशस्त मेगा चार्जिंग स्टेशन उभारले आहे. येथील प्रत्येक चार्जरची क्षमता १२० केव्ही एवढी जास्त आहे. त्यामुळे सर्वसाधारण चार्जरच्या तुलनेत अल्प वेळेत गाडी चार्ज करणे शक्य होणार असल्याचे टाटा पाॅवरचे सीईओ प्रवीर सिन्हा यांनी सांगितले. या वेळी टाटा मोटार्सचे एमडी शैलेश चंद्रा यांच्यासह टाटा पाॅवरचे अधिकारी उपस्थित होते.
हरित ऊर्जेचा पुरवठा
विमानतळानजीक उभारलेल्या या मेगा चार्जिंग स्टेशनवर चार्ज केल्या जाणाऱ्या वाहनांना १०० टक्के हरित म्हणजे सौर, पवन आणि जलविद्युत ऊर्जा प्रकल्पात निर्माण होणारी वीज वापरली जाणार आहे. त्यासाठी येथे जेवढी वीज वापरली जाईल तेवढी वीज टाटा पाॅवरकडून हरित ऊर्जा प्रकल्पातून ग्रीडमध्ये टाकली जाणार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही मेगा चार्जिंग स्टेशन
विजेवरील वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, त्यांना सहजपणे आपले वाहन चार्ज करता यावे म्हणून टाटा पाॅवर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत वेगवगेळ्या ठिकाणी मेगा चार्जिंग स्टेशनची उभारणी करणार असल्याचे प्रवीर सिन्हा यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.