मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत ''व्होटचोरी''? डॉ. नरेंद्र पाठक, प्रमोद पवार यांचे गंभीर आरोप
साहित्य संघाच्या निवडणुकीत मतचोरी?
डॉ. नरेंद्र पाठक, प्रमोद पवार यांचे गंभीर आरोप
मुंबई, ता. ९ ः मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट मतपत्रिका सादर केल्या जात आहेत, तर दुसरीकडे निवडणुकीत उभ्या असलेल्या काहींनी निवडणूक अधिकाऱ्यांशीच संगनमत करून ४०० ते ५०० मतपत्रिका चोरून ठेवल्या असून त्यात मतचोरी होत असल्याचा गंभीर आरोप डॉ. भालेराव विचार मंचातर्फे नरेंद्र पाठक यांच्यासह दिवाकर दळवी, प्रमोद पवार यांच्याकडून करण्यात आला.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात पत्रकार परिषदेत मुंबई मराठी साहित्य संघाकडून घेण्यात येत असलेली निवडणूक ही बेकायदा असून त्यासाठी आम्ही तक्रारही केल्याचे सांगण्यात आले. संघाच्या निवडणुकीसाठी मिळालेल्या माहितीत निवडणुकीचा जाहीरनामा एक हजार ३१५ लोकांना पाठवण्यात आला, त्यातील ३४४ परत आले. त्यामध्ये पत्ता सापडत नाही तर काही मतदार हे मृत व्यक्ती, असे शेरे मारून परत आल्या आहेत. याचाच अर्थ संघाकडच्या सभासद याद्या अद्ययावत केलेल्या नाहीत. अनेक वेळा विनंती केल्यावर संपर्क क्रमांक दिले ते ही चुकीचे दिले होते, असेही आरोप या वेळी करण्यात आले. तसेच कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, अशी मंचाची भूमिका असून यासाठी आवश्यकता पडली तर आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही करणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई मराठी साहित्य संघाची १७ सप्टेंबरला पंचवार्षिक निवडणूक होत असून त्यात ऊर्जा पॅनेल आणि डॉ. भालेराव विचार मंच यांच्यात मतपत्रिकांवरून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर डॉ. भालेराव विचार मंचाच्या पत्रकार परिषदेत या निवडणूक प्रक्रियेत मतपत्रिका गहाळ झाल्या, पोस्टाने पाठवलेल्या अनेकांना मिळाल्या नाहीत. यात निवडणूक अधिकारी वकील यशोधन दिवेकर यांनी अनेक मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी याकडे कानाडोळा केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच मुंबई मराठी साहित्य संघाने मतपत्रिका पाठवण्याचे कंत्राट ज्या खासगी एजन्सीला दिले त्यांनी या मतपत्रिका प्रत्यक्षात न पाठवता केवळ बुकिंग पावत्या साहित्य संघात जमा केल्या असून यात फौजदारी स्वरूपाचा आर्थिक घोटाळा असल्याचाही आरोप या वेळी करण्यात आला. तसेच मुंबई मराठी साहित्य संघाच्या असंख्य मतदार सदस्यांसोबत असा प्रकार झाल्याची शक्यता असल्याने याबाबत कंत्राटदार आणि निवडणूक अधिकारी यांची फौजदारी चौकशी व्हायला हवी. तसेच ६०० पत्रिका गेल्या कुठे, याचीही चौकशी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
...
मुंबई मराठी साहित्य संघाची निवडणूक प्रक्रिया ही नियमानुसारच सुरू आहे. काहीच्या तक्रारीनंतर निरीक्षकांची निवड झाली आहे. सर्व प्रक्रिया पारदर्शक सुरू आहे. कोणत्याही मतदारांचे मतदान त्यांच्या अधिकाराप्रमाणे व्हावे, असा प्रयत्न आहे. जर काहींना आक्षेप असतील तर त्यांनी समोर येऊन आपल्या तक्रारी मांडायला हव्यात. शिवाय जी मुदतवाढ दिली आहे, त्यातून अधिकाधिक मतदारांना संधी मिळावी, हा उदात्त हेतू यामागे आहे; मात्र काहींनी त्याचाही चुकीचा अर्थ काढला आहे.
- ॲड. यशोधन दिवेकर, निवडणूक अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.