शैक्षणिक, आर्थिक आणि नातेसंबंधातील ताण प्रमुख कारण

शैक्षणिक, आर्थिक आणि नातेसंबंधातील ताण प्रमुख कारण

Published on

तरुणांमध्ये मानसिक आरोग्याचे वाढते प्रमाण
१८ ते २५ वयोगट सर्वाधिक तणावात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महानगरातील प्रत्येक व्यक्ती ताणतणावाचे जीवन जगत असतात. एम-पॉवर या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थेला असे आढळून आले, की मुंबईतील तरुणांमध्ये मानसिक आरोग्याचे प्रमाण वाढत आहे. १८ ते २५ वयोगटातील तरुण सर्वाधिक तणावात असून शैक्षणिक, आर्थिक आणि नातेसंबंधातील ताण प्रमुख कारण ठरत आहे. या वयोगटात व्यक्तिमत्त्व विकार, ओसीडी, बायपोलर डिसऑर्डर आणि अमली पदार्थांचा वापर यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. नीरजा बिर्ला यांनी स्थापन केलेल्या आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा एमपॉवर या संस्थेने तरुणांच्या तातडीच्या मानसिक आरोग्याच्या गरजांवर प्रकाश टाकला.

एमपॉवरच्या अहवालानुसार, २०२४ पासून ५३ उच्च-जोखीम असलेल्या तरुणांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे, की १८-२५ वयोगटातील तरुण मुंबईकर जटिल मानसिक आरोग्य आव्हानांना बळी पडत आहेत. या वयोगटातील पुरुष आणि महिला दोघांनाही मानसिक समस्या जाणवत आहे. यामध्ये स्वभाव, व्यक्तिमत्त्व विकार, बायपोलर डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह वर्तन आणि अमली पदार्थांचा वापर, व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, नातेसंबंधातील अडचणी आणि कौटुंबिक संघर्षांसह इतर समस्या आहेत. शैक्षणिक दबाव, आर्थिक अस्थिरता, सामाजिक आयसोलेशन आणि भावनिक अनियमन यामुळे हे आणखी वाढले आहे. याचा परिणाम म्हणून यातील अनेकांना आयुष्यात एकदातरी आत्महत्येचा विचार आला आहे. या निष्कर्षांमुळे लवकर मानसिक आरोग्य हस्तक्षेप, सतत जागरूकता मोहिमा आणि शैक्षणिक संस्था, कुटुंबे आणि व्यापक समुदायासह एकात्मिक समर्थन प्रणालींची तातडीची गरज निर्माण झाली आहे.

दररोज सरासरी चार आत्महत्या?
एनसीआरबीच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे, की शहरात दररोज सरासरी चार आत्महत्या नोंदवल्या जातात. ही धक्कादायक आकडेवारी युवा-केंद्रित धोरणे, प्रतिबंधात्मक काळजी आणि सुलभ मानसिक आरोग्यसेवांसाठी कृती करण्याचे आवाहन अधोरेखित करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com