महावितरण मालामाल!

महावितरण मालामाल!

Published on

महावितरण मालामाल!
सरकारकडून वीजबिल सवलतीपोटी ३,२०० कोटी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : कृषिपंपधारकांसह सामान्य वीज ग्राहकांकडून वीजबिल भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याने सातत्याने आर्थिक अडचणींचा सामना करणारे महावितरण सध्या मालामाल झाले आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत वीज आणि औद्योगिक, यंत्रमागधारक, वस्त्रोद्योगाला दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या बिलापोटी राज्य सरकारने महावितरणला तब्बल ३,२५८ कोटी रुपये अदा केले आहेत. त्यामुळे महावितरणला वीज खरेदी खर्चाबरोबरच अन्य देणी भागवणे शक्य होणार आहे.
महावितरणचे राज्यभरात सुमारे पावणेतीन कोटी वीज ग्राहक असून त्यामध्ये ६० लाखांहून अधिक शेतकरी आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. तसेच औद्योगिक ग्राहकांना, वस्त्रोद्योग, यंत्रमागधारकांनाही सवलतीत वीज पुरवली जाते, त्याची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाते; मात्र ही रक्कम कधी मिळणार, याकडे महावितरणचे लक्ष लागलेले असते. सरकारने आता एकरकमी ३,२५८ कोटी रुपये महावितरणला दिले आहेत.

कशापोटी किती रक्कम मिळाली?
- औद्योगिक ग्राहक - ३०० कोटी
- वस्त्रोद्योग ग्राहक - १८० कोटी
- यंत्रमाग ग्राहक - ४५० कोटी
- कृषिपंप (शेतकरी) - २,३२८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com