मुंबईत ४ महिन्यांत २० हजारांहून अधिक बेकायदा बॅनर हटवले

मुंबईत ४ महिन्यांत २० हजारांहून अधिक बेकायदा बॅनर हटवले

Published on

२० हजारांपेक्षा अधिक बेकायदा बॅनर हटवले
सर्वाधिक राजकीय पोस्टर्सचा समावेश

मुंबई, ता. १० : मुंबईत बॅनर्स, होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. बेकायदा पोस्टर्स, बॅनरवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे; मात्र कारवाईनंतरही बॅनरबाजी थांबलेली नाही. पालिकेने गेल्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत पालिकेने तब्बल २०,३४५ बेकायदा बॅनर आणि पोस्टर्स हटवले, त्यापैकी सर्वाधिक जवळपास निम्मे म्हणजे ४८ टक्के राजकीय पोस्टर्स होते. या अनधिकृत पोस्टरबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण तर होतच आहे; पण नागरिक आणि वाहतुकीलाही त्रास सहन करावा लागतो आहे.
गेल्या मंगळवारी एस विभागातील जेव्हीएलआर मार्गावर वाऱ्यामुळे काही मोठे राजकीय बॅनर कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; पण यामुळे बेकायदा बॅनरबाजीमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अवैध बॅनर्स, पोस्टर्स व होर्डिंगवर कठोर कारवाईचे आदेश अनेकदा दिले आहेत. तसेच अधिकृत पोस्टर्सवर क्यूआर कोड छापण्याची अट घालण्यात आली आहे; मात्र या नियमांचे पालन होत नाही. गणेशोत्सव काळात बॅनरबाजीची स्पर्धाच रंगल्याचे समोर आले आहे. गणेशोत्सवात मुंबईत जागोजागी बॅनर्स लागले होते. गेल्या ७ व ८ सप्टेंबर रोजी पालिकेने तब्बल ७,४५४ बॅनर्स पालिकेने हटवले. पालिकेची कारवाई होत असली तरी बॅनरबाजी सुरूच असल्याचे समोर आले आहे.
................
चार महिन्यांची आकडेवारी
हटवलेले एकूण बॅनर-पोस्टर्स : २०,३४५
राजकीय पोस्टर्स : ९,९०६
व्यावसायिक पोस्टर्स : ५,३४२
धार्मिक पोस्टर्स : ५,०९७
नोंदवलेले गुन्हे (एफआयआर) : ४१
पोलिसांत तक्रारी : ३३७
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com