राज्यात एकूण वाहनांच्या तुलनेत दोन टक्के इलेक्ट्रिक वाहने

राज्यात एकूण वाहनांच्या तुलनेत दोन टक्के इलेक्ट्रिक वाहने

Published on

राज्यात एकूण वाहनांच्या तुलनेत दोन टक्के इलेक्ट्रिक वाहने
चार्जिंग स्‍टेशन वाढवण्याची गरज; खरेदीकडे कल कमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : प्रदूषणाची हानी रोखण्यासाठी केंद्र-राज्य सरकारने ई-वाहनांना सबसिडी दिली आहे, तरीदेखील राज्यातील नागरिकांनी ई-वाहनांकडे पाठ फिरविल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. राज्यात सध्याच्या घडीला एकूण चार कोटी सात लाख ५१ हजार ६८७ वाहनांची नोंदणी आहे. त्यापैकी फक्त आठ लाख नऊ हजार ८८२ वाहने ई-वाहने आहेत. म्हणजेच राज्यात एकूण वाहनांच्या नोंदणीच्या तुलनेत केवळ १.९९ टक्के ई-वाहने आहेत.
पेट्रोल-डिझलेच्या सतत वाढणाऱ्या किमती, धुरामुळे निर्माण होणारे वायू प्रदूषण यामुळे ई-वाहनांवर भर देण्यात आला. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी दिली. त्यानंतर राज्य सरकारनेदेखील सबसिडी देऊ केली. सार्वजनिक परिवहन महामंडळांना ई-बसकरिता सबसिडी देण्यात आली. परंतु आता ई-वाहन नको असे नागरिक म्हणत आहेत. ई-वाहनांना चार्जिंग करावे लागते. आजही चार्जिंग स्टेशनची संख्या गाड्यांच्या तुलनेत अपुरी आहे. वाहन बाहेर काढल्यानंतर चार्जिंग स्टेशन शोधावे लागते.
चार्जिंग स्टेशनची संख्या अपुरी असल्याने गाडी तिथपर्यंत जाईल की नाही याची खात्री नसते. चार्जिंग स्टेशन मिळाले नाही तर गाडी टो करून घरी आणावी लागते. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास अनेकदा टाळला जातो. या वाहनांचा खर्च पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत जास्त आहे. या गाड्या दुरुस्तीसाठी शोरूममध्येच घेऊन जाव्या लागतात. त्यामुळे खर्च जास्त असतो. याशिवाय या गाड्यांची रिसेल व्हॅल्यू खूप कमी आहे. त्यामुळे नागरिक ई-वाहन खरेदी करीत नाहीत.

इलेक्ट्रिक वाहने-------२०२१-२२-----------२२-२३-----------२३-२४----------२४-२५----------२५-२६ (८ सप्टेंबरपर्यंत)-----------एकूण वाहने
दुचाकी------३७,८९७ (१.९८%)------१,३३,५८६ (५.४६%)------१,७८,५८० (६.८३%)-------२,०४,८९५ (६.९४%)---- ८१,४२० (६.५५ %)---६,६३,७४० (१.६३%)
चारचाकी-------५,७६३ (०.३०%)-----१०,७१७ (०.४४%)-----१२,३८५ (०.४७%)-----१६,२१२ (०.५५%)----१४,६७९ (१.१८%)------६२,३९३(०.१५%)
मोपेड-------१,०६३ (०.०६%)----५,२१६ (०.२१%)----५,४०७ (०.२१%)----७,१५३ (०.२४%)----३,०३२ (०.२४%)---६२३,५७८ (०.०६%)
ई-रिक्षा-----१,१९९ (०.६%)----४,३७२ (०.१८%)-----५,०९४ (०.१९%)----३,९२५ (०.१३%)----१,२४७ (०.१०%)----१९,३३५ (०.०५%)
एकूण---------४७,४८८ (२.४८%)-----१,५८,६९३ (६.४८%)-----२,१२,३९८ (८.१२%)-----२,४६,३९६ (८.३५%)----१,०७,१४८ (८.६२%)------८,०९,८८२ (१.९९%)

राज्यातील एकूण वाहनांची नोंदणी
वर्ष---------वाहनांची संख्या
२१-२२------१९,१२,४४७
२२-२३------२४,४७,२५७
२३-२४-------२६,१४,७२०
२४-२५------२९,५२,४५६
२५-२६------१२,४३,५२५
एकूण----------४,०७,५१,६८७
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com