प्रभाग रचनेवरून नाराजीचा सूर

प्रभाग रचनेवरून नाराजीचा सूर

Published on

प्रभागरचनेवरून नाराजीचा सूर
दोन माजी नगरसेवकांना फटका, इच्छुकांमध्ये समाधान
खारघर, ता. ११ (बातमीदार) : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभागरचनेत मुर्बीगाव प्रभाग क्रमांक तीनमध्ये समावेश केला आहे, तर सेक्टर ११, १२ परिसरातील बहुतांश भाग प्रभाग क्रमांक सहामध्ये गेल्याने माजी नागरसेवकांत नाराजी आहे, तर इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये तळोजा पाचनंद, तळोजागाव आणि खारघर सेक्टर १९ मुर्बीगाव सह सेक्टर २३ ते ३६ मधील सिडकोचा वसाहतीचा समावेश केला आहे. प्रभागात मुर्बी, रांजणपाडा, ओवेपेठ, ओवेगाव, खुटूक बांधण, ओवेकॅम्प आदी गावे आणि पापडीचा पाडा, धामोळे आणि कातकरी आदी पाड्यांचा समावेश आहे. २०१७ मध्ये पालिका निवडणुकीत मुर्बी गाव प्रभाग क्रमांक चारमध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र नव्या प्रभागरचनेत मुर्बी गाव तीनमध्ये आल्याने हक्काचे मतदान गेल्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. विशेष खारघर सेक्टर-१२ हे खारघरमधील सर्वात मोठा नोड म्हणून ओळखले जाते. पूर्वी हा सेक्टर प्रभाग क्रमांक पाचमध्ये होता, मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभागरचनेत सेक्टर-१२ मधील बहुतांश भाग आणि ११ प्रभाग क्रमांक सहामध्ये समावेश करण्यात करण्यात आला आहे. सेक्टर-११,१२ मध्ये माजी नगरसेविका आणि कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. या नोडमधील गरड यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी खेळी केल्याची चर्चा आहे.
-------------------------------------
कार्यकर्त्यांमध्ये चुरस रंगणार
नवीन प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये सेक्टर-३ ते ७ आणि सेक्टर-१२ मधील काही इमारत मिळून प्रभाग क्रमांक चारचा समावेश करण्यात आला. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे, तर प्रभाग क्रमांक सहामध्ये सेक्टर-२, ८, १०, ११, १२ आणि १५ ते १८ सेक्टरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांना सेक्टर-११ आणि १२ मध्ये पक्ष बांधणीसाठी काम करावे लागणार असल्याने काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांमध्ये चुरस रंगणार आहे.
------------------------------------
२०१७ च्या पालिका निवडणुकीत मुर्बी गाव प्रभाग क्रमांक चारमध्ये होता. नव्याने तयार प्रभागरचनेत तीनमध्ये समावेश करण्यात आले आहे. मुर्बी गाव पूर्वीच्या प्रभागात असावा, अशी मागणी निवडणूक विभागाकडे केली आहे.
- नेत्रा पाटील, माजी नगरसेविका
------------------------------------
प्रभाग क्रमांक पाचमधील सेक्टर-११ आणि १२ चा समावेश बहुतांश भाग प्रभाग क्रमांक सहामध्ये गेला आहे. २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक पाचमधून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे नव्याने तयार केलेली प्रभागरचना राजकीय खेळी आहे.
- लीना गरड, माजी नगरसेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com