लाचखोरी प्रकरणात चौघे अटकेत
लाचखोरी प्रकरणात चौघे अटकेत
सिडकोच्या सहनिबंधक कार्यालयातील प्रकार
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : सिडकोच्या वाशी येथील सहकारी संस्था सहनिबंधक कार्यालयातील चौघांना साडेतीन लाखांची लाच घेताना बुधवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांमध्ये लाचखोरी प्रकरणात सिडको कार्यालयातील सहा जणांवर कारवाई झाली आहे.
वाशी सेक्टर-९ येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या सचिवाने एसीबीकडे तक्रार केली होती. सोसायटीच्या कमिटीविषयी दाखल झालेल्या प्रकरणाचा निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी सिडकोच्या सहनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पाच लाखांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३.५ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर सोसायटीच्या सचिवाने अँटी करफ्शन ब्युरोच्या नवी मुंबई युनिटकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने १२ ते २२ ऑगस्टपर्यंत विविध तारखांना लाच मागणीसंदर्भात पडताळणी केली. याच अनुषंगाने बुधवारी सायंकाळी वाशी कार्यालयात सापळा रचण्यात आला. या वेळी तक्रारदाराकडून ३.५ लाख रुपये स्वीकारणारा महेश कामोठकरसह राहुल कांबळे, धनाजी काळुखे यांनी अटक केली. त्यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ७ (अ) व १२ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
-----------------------------------------
१५ दिवसांत सहा प्रकरणे
नवी मुंबई एसीबीच्या पथकाने सिडकोच्या नेरूळ येथील क्षेत्रीय कार्यालयातील एक महिला, कंत्राटी कामगार अशा दोघांना ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. जूनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे युनिटने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून दीड लाखाची लाच स्वीकारणाऱ्या सिडको एम्फ्लॉईज युनियनच्या अध्यक्षाला रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे सिडको कार्यालयातील भ्रष्ट कारभार उघड झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.