मुरबाडमध्ये वारंवार एसटी बसमध्ये बिघाड
मुरबाड, ता. ११ (बातमीदार) : मुरबाड एसटी आगारातील बस सतत रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारपासून बुधवारपर्यंत सलग तीन दिवस अशा घटना घडल्या आहेत.
सोमवारी मुरबाड–सरळगाव रस्त्यावर नढई गावाजवळ एक बस अचानक बंद पडली. त्यानंतर मंगळवारी मुरबाड-म्हाडस-नारिवली बस भुवन गावाजवळ बंद पडली. तर बुधवारी दुपारी तीन वाजता मुरबाडहून बदलापूरकडे जाणारी बस सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुटलीच नाही. या विलंबामुळे संतापलेल्या प्रवाशांनी आगारातील कार्यशाळेत धाव घेऊन व्यवस्थापकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांचे म्हणणे आहे की, बंद पडणाऱ्या बसमधील प्रवाशांची कोणतीही पर्यायी व्यवस्था केली जात नाही. दररोज किमान दोन ते तीन बस रस्त्यात बंद पडतात. नव्या बस मुरबाड आगारात आलेल्या असूनही त्या स्थानिकांना उपलब्ध करून न देता नगर, आळेफाटा, बीड अशा लांब पल्ल्याच्या मार्गांवर सुरू केल्या आहेत. त्यामुळे मुरबाडकरांना या नव्या बसमध्ये प्रवासाची संधी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नादुरुस्त बस लवकरच दुरुस्त करण्याचे प्रयत्न
मुरबाड तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे एसटी बस वारंवार नादुरुस्त होत आहेत. मुरबाड आगारातील पाच बस जुन्या झाल्याने त्या भंगारात काढण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पाठवण्यात आलेल्या सीएनजी बसही परत पाठविल्या आहेत. त्यामुळे आगारात बस कमी पडत आहेत. त्यासाठी नादुरुस्त बस लवकरात लवकर दुरुस्त करून वापरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे मुरबाड आगारप्रमुख योगेश मुसळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.