कृती आराखड्यासाठी कसली कंबर
उल्हासनगर, ता. ११ (बातमीदार) : सरकारच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यात राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महापालिकेने १५० दिवसांच्या कृती आराखड्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी तीन ते चार तासांच्या मॅरेथॉन बैठक पार पडल्याचे जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी दिली.
बैठकीत विभागप्रमुखांना दोन नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पी. जी. पोर्टलवरील तक्रारींचा नियमित निपटारा, माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे दैनंदिन विभागनिहाय माहिती एचओडी ग्रुपमध्ये अपलोड करणे, लोकसेवा हक्क अधिनियमानुसार विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करणे, अभ्यागतांच्या तक्रारींना वस्तुस्थितीदर्शक स्वरूपात उत्तर देणे, प्रलंबित तक्रारी वेळेत निकाली काढणे अशा विविध सूचना दिल्या गेल्या.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, धीरज चव्हाण, उपायुक्त विशाखा मोटघरे, दीपाली चौगले, अनंत जवादवार, स्नेहा करपे, सहाय्यक संचालक नगररचना सं. ह. साकुरे, मुख्यलेखा परीक्षक अभिजित पिसाळ, शहर अभियंता नीलेश शिरसाठे, नगररचनाकार विकास बिरारी, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अलका पवार, मयुरी कदम, सुनील लोंढे, सिस्टीम एनालिस्ट श्रद्धा बाविस्कर यांसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
ई-कार्यालय, नागरी सेवा सुधारणा आदेश
उपायुक्त व विभागप्रमुखांनी आपापल्या विभागाचा आढावा पुढील बैठकीत आयुक्तांसमोर सादर करावा, ई-कार्यालयाद्वारे फाईल व रिसीप्टवरील कार्यवाही पूर्ण करावी, महत्त्वाच्या केंद्र व राज्य सरकारच्या योजना डॅशबोर्डवर अपलोड करण्यासाठी यादी सादर करावी, तसेच नागरी सुविधा केंद्रात लोकसेवा हक्क अधिनियमासाठी एक खिडकी सुरू करावी, असे आदेश आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.