अनाथ मुलांना मदतीचा हात

अनाथ मुलांना मदतीचा हात

Published on

उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : कर्जबाजारीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची निरागस लेकरं, जी आईवडिलांच्या छत्रछायेशिवाय अनाथ झाली आहेत, त्यांनी शहराला भेट देत गणरायाच्या आरतीचा मान मिळवला. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या पुढाकाराने मध्यवर्ती पोलिस ठाण्यात व विविध गणेशोत्सव मंडळांत झालेल्या या कार्यक्रमाने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणले. ‘आमच्या बापाने आत्महत्या केली ती चूक तुम्ही करू नका...’ असा संदेश देणाऱ्या पथनाट्याने वातावरण भारावून गेले आणि गणेशोत्सवाने खरी माणुसकी जागवली.
कर्जाच्या विळख्यात सापडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची अशी शेकडो मुले-मुली त्र्यंबकराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील आधारतीर्थ आश्रमात राहत आहेत. या लेकरांनी गणेशोत्सवानिमित्ताने उल्हासनगराला भेट दिली आणि शहरवासीयांच्या मनाला भिडणारा हृदयस्पर्शी संदेश दिला. या मुलांनी पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या कार्यालयासह मध्यवर्ती पोलिस ठाण्याला भेट देऊन गणरायाच्या आरतीचा मान मिळवला. या वेळी मुलांनी सादर केलेले पथनाट्य हृदय पिळवटून टाकणारे होते. याप्रसंगी या मुलांना नवीन कपडे, अन्नधान्य व आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली. या मुलांनी गणेशोत्सव काळात शहरातील अनेक मंडळांनाही भेट दिली. धार्मिक भजन-कीर्तन सादर करून मुलांनी वातावरण भारावून टाकले. मंडळांनी त्यांना तांदूळ, डाळ, गहू, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या भेटवस्तू देत सामाजिक जबाबदारी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com