सिमेंट कॉन्क्रीट मिक्सरने चिरडल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
काॅँक्रीट मिक्सरखाली चिरडून
१२ वर्षीय मुलाचा मृत्यू
भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : भाईंदर पूर्वेतील काशीमिरा परिसरात गुरुवारी (ता. ११) सिमेंट काॅँक्रीट (आरएमसी) मिक्सरच्या वाहनाखाली सापडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सनी राठोड असे मृत मुलाचे नाव आहे. ताे शाळेतून घरी जात असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास नीलकमल नाक्याजवळ ही घटना घडली.
मिक्सरने सनीला धडक दिल्यानंतर ताे त्याच्या अंगावरून गेला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री आठच्या सुमारास उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरएमसी प्रकल्पांवर तातडीने कारवाई करून ते बंद करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे शहरप्रमुख संदीप राणे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.