कर्करोगग्रस्त मुलांसाठी निवासी केंद्रे उभारणार
कर्करोगग्रस्त मुलांसाठी निवासी केंद्रे उभारणार
खारघरच्या टाटा कॅन्सर सेंटरमध्ये सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : देशातील विविध राज्यांमधून मुले आणि त्यांचे पालक खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रिटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटर (ॲक्ट्रेक)मध्ये कर्करोगाच्या उपचारांसाठी येतात. त्यांना उपचारांसाठी येथे अनेक महिने राहावे लागते. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने अनेक पालकांना त्यांच्या मुलांसह रस्त्यावर राहावे लागते. आता त्यांच्या राहण्याच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, दोन निवासी केंद्रे सुरू होणार आहेत.
मॉडेलएज इंडियाने खारघरमधील अॅक्ट्रेक कॉम्प्लेक्समध्ये सेंट ज्यूड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्सच्या भागीदारीत दोन समर्पित निवासी केंद्रांचे काम सुरू केले आहे. या केंद्रांद्वारे एकाच वेळी २४ कुटुंबांना मोफत निवास आणि सर्वांगीण सहाय्य मिळेल. सुरक्षित निवाऱ्यासोबत पोषण, मार्गदर्शन, शिक्षण आणि उपचार सुरू असलेल्या मुलांसाठी वाहतूक सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाईल. मॉडेलएज इंडियाच्या ओफिरा भाटिया म्हणाल्या की, ही केंद्रे उपचार घेत असलेल्या मुलांना मोफत घरे देण्यास मदत करतील. केंद्रे एकदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, दरवर्षी ७००हून अधिक कुटुंबांना मदत होईल. पुढील २० वर्षांत ते ३४,००० कुटुंबांना सुरक्षित निवारा प्रदान करेल.
सेंट ज्यूड्सचे सीईओ अनिल नायर म्हणाले, ‘‘र्बल पार्श्वभूमीतून आलेल्या आणि आपल्या मुलांच्या कॅन्सर उपचारांसाठी मोठ्या शहरांत आलेल्या कुटुंबांसाठी ही केंद्रे आशेचा किरण आहेत. लहान रुग्ण लवकर बरे होऊ शकतात. मॉडेलएज इंडियाच्या पाठबळामुळे हे नवीन केंद्र दरवर्षी शेकडो मुलांना आधार देईल.’’
...
वैशिष्ट्ये अशी...
- १२ मजली इमारत
- २३४ केंद्रांचे संकुल
- दोन केंद्रे उभारणार
- दरवर्षी ७००हून अधिक कुटुंबांना आधार
- २० वर्षांत सुमारे ३४,००० कुटुंबांना आसरा
- प्रत्येक केंद्रात एकाच वेळी १२ कुटुंबांना राहण्याची सोय
- दरवर्षी ६०पेक्षा जास्त कुटुंबे उपचार सुरू ठेवू शकतील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.