कॅलिडोस्कोप

कॅलिडोस्कोप

Published on

२०२३मधील महिला, शांतता आणि सुरक्षा निर्देशांकात १७७ देशांपैकी भारत हा १२८व्या क्रमांकावर होता. तर नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स २०२५च्या निर्देशांकात ५५.८ गुणांसह भारत १३५ देशांमध्ये ६७व्या क्रमांकावर होता. यावरून देशातील महिला हिंसाचाराचे चित्र समोर येते. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक (नारी) २०२५ नुसार, कोहिमा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, ऐझॉल, गंगटोक, इटानगर आणि मुंबई ही शहरे महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहरे ठरली आहेत. १९९३साली देशातील पहिले महिला धोरण राबविणाऱ्या राज्यातील शहर महिला सुरक्षेबाबत सातव्या स्थानावर फेकले गेले आहे. शासनस्तरावर विविध उपक्रम, अत्याधुनिक उपाययोजना करूनही मुंबईतील महिलांना असुरक्षित का वाटत आहे, याचा घेतलेला आढावा.


मुंबई हे भारतातल्या इतर कोणत्याही शहरांपेक्षा आजही सुरक्षित शहर आहे; मात्र १९९३साली देशातील पहिले महिला धोरण राबविणारे राज्यातील शहर महिला सुरक्षेबाबत सातव्या स्थानावर फेकले जाणे, हे भूषणावह नाही. २०१४नंतर महिला सुरक्षेचा आलेख उतरता राहिला आहे. आज आपण जगभरातील गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत; मात्र मुंबई खरेच सुरक्षित आहे का, यासाठी महिला आयोगासह सर्वांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवत पुढाकार घेत नव्याने धोरणांची निर्मिती करून त्याची तितकीच अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
- वर्षा देशपांडे


जगभरातील महिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशांची यादी
आइसलँड
फिनलंड
आयर्लंड
बेल्जियम
डेन्मार्क
कॅनडा
फ्रान्स
नॉर्वे
स्वीडन
स्वित्झर्लंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com