नवरात्रीनिमित तरुणाईचा घागरा-लहेंगा-चोळी खरेदीकडे कल

नवरात्रीनिमित तरुणाईचा घागरा-लहेंगा-चोळी खरेदीकडे कल

Published on

तरुणाईचा घागरा-लहेंगा-चोळी खरेदीकडे कल
गरबा जीन्स, पॉकेट लेहेंगा, गुजराती लुक जॅकेटने वेधले नागरिकांचे लक्ष
ठाणे, ता.१३ (बातमीदार) : ठाणे शहरातील बाजारात नवरात्रीनिमित खरेदीसाठी गरबा रसिकांची मोठ्या प्रमाणावर लगबग सुरु झाली आहे. रोज वेगवेगळी स्टाईल, ड्रेसिंग करून दांडिया खेळायला जाणं म्हणजे तरुणाईसाठी मोठा आनंद. तसेच बाजारपेठ विविध रंगीबिरंगी आणि आकर्षक कपड्यांनी सजले आहेत. अनेक ठिकाणी चनिया-चोळी आणि घागरा-लहेंगा-चोळीसाठी मोठ्या प्रमाणावर लगबग सुरु असून तरुणाईला परवडणाऱ्या दरात विविध स्टाईलचे कपडे उपलब्ध झाले आहेत.
गणेशोत्सव झाल्यानंतर आता तरुणाईला वेध लागलेले आहेत ते नवरात्रीचे. या नवरात्री उत्सवाचे नऊ दिवस म्हणजे तरुणाईसाठी नुसती धमाल. याच अनुषंगाने ठाण्यातील भारती वस्त्र भंडार यांनी त्यांचे नवनवीन गरबा कलेक्शन नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांसाठी देखील विविध आकर्षक रंगाचे व हलके घागरे, चैनीया चोली, गुजराती जॅकेट, टीशर्ट, गुजराती व महाराष्ट्रीन टोपी, गरबा जीन्स, पॉकेट लेहेंगा, आदी अश्या विविध स्टाईलचे कपड्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

चौकट
१५० रुपयांपासुन बाजारात उपलव्ध
लहान मुलांसाठी दीडशे रुपयांपासून सुरू असून मोठ्यांचे ३०० रुपयांपासून सुरुवात, जॅकेट ३०० रुपये ते रु १०००, महाराष्ट्रीन व गुजराती टोपी रु ५० ते रु १०० अशी उपलब्ध आहे. दरम्यान तरुण पिढीला रोज वेगवेगळी स्टाईल, ड्रेसिंग करून दांडिया खेळायला जाणं म्हणजे तरुणाईसाठी मोठा आनंद असतो. यामुळे भारती वस्त्र भंडार दरवर्षी काही तरी नवीन उपलब्ध करत असून सर्व गरबा प्रेमींचा याकडे चांगलं कल दिसतो.

Marathi News Esakal
www.esakal.com