आर्थिक क्षेत्रांना हरित ऊर्जा
आर्थिक क्षेत्रांना हरित ऊर्जा
जेएनपीएचा पवनऊर्जा खरेदीसाठी करार
उरण, ता. १३ (वार्ताहर) ः जेएनपीए-विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड)मधील सर्व कामकाजासाठी १०० टक्के हरित ऊर्जा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने ग्रीड-कनेक्टेड पवनऊर्जेच्या खरेदीसाठी नव्या अल्पकालीन ओपन ॲक्सेस करारावर स्वाक्षरी केली आहे.
जेएनपीएमध्ये एसईझेडचे शंभर टक्के हरित ऊर्जेकडे भविष्याभिमुख औद्योगिक परिसंस्था घडवण्यात येत आहे. या उपक्रमामुळे केवळ पर्यावरणावरील आमचा परिणाम कमी होत नाही तर एसईझेडमध्ये कार्यरत उद्योगांसाठी स्पर्धात्मक फायदेही निर्माण होतात. या हरित बदलाचे नेतृत्व करून जेएनपीए भारतातील शाश्वत, बंदर-केंद्रित औद्योगिक विकासाला गती देणारा आघाडीचा घटक असल्याची पुष्टी केल्याचे जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सांगितले. तसेच या माध्यमातून पर्यावरणीय जबाबदारी, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत औद्योगिक विकासाला बळकटी मिळाली आहे.