गावाला आत्मनिर्भर बनवणं हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उद्देश

गावाला आत्मनिर्भर बनवणं हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उद्देश

Published on

आत्मनिर्भर बनवणं हाच मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचा उद्देश
खासदार डाॅ.हेमंत सवरा यांचे माहिती
वाडा, ता. १३ (बातमीदार) ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामविकासाच्या क्षेत्रात एक नवे पर्व ठरणार असून या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींना आर्थिक स्वायत्तता, पारदर्शक कारभार आणि जबाबदार नेतृत्व प्रदान करणे हा आहे. गावोगाव रोजगार निर्मितीला चालना देणे शेतीपूरक व लघुउद्योग वाढवणे महिलांचे सबलीकरण करणे, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव बदल घडवून गावाला आत्मनिर्भर बनवणे हा या उपक्रमाचा गाभा असल्याची माहिती खासदार डाॅ.हेमंत सवरा यांनी दिली.
ग्रामविकास विभागामार्फत राबविऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन वाडा येथील पां.जा.विद्यालय सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात ग्रामपंचायतींनी आपले कार्य पारदर्शक पध्दतीने करावे, नागरिकांचा विश्वास संपादन करावा आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाच्या विकासात आपला वाटा उचलावा, असे आवाहन केले. तसेच, गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग, श्रमदान आणि स्वच्छतेबाबत जागरूकतेमुळे हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून गावागावात शाश्वत विकासाचे मॉडल उभारणे, सामाजिक न्यायाची अंमलबजावणी, पर्यावरणीय संवर्धन आणि लोकसहभागातून लोकचळवळ उभी करणे हे त्यामागील खरे उद्दीष्ट आहे. या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायती अधिक सक्षम स्वावलंबी आणि आदर्श बनतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पालघर जिल्हा पर‍िषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. तर कार्यशाळेसाठी मास्टर स्टेनर म्हणून ग्रामपंचायत खानिवलीचे सरपंच भरत हजारे व ग्रामपंचायत अधिकारी दिपक पाटील यांनी अभियानाबद्दल विस्तृत माहिती दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com